• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • मोठी बातमी! TCS 2022च्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 77,000 फ्रेशर्सना देणार नोकरी; HR हेड मिलिंद लक्कड यांची घोषणा

मोठी बातमी! TCS 2022च्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 77,000 फ्रेशर्सना देणार नोकरी; HR हेड मिलिंद लक्कड यांची घोषणा

इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयबीएम अशा अनेक कंपन्या कर्मचारी भरती करत आहेत.

 • Share this:
  कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) गेलं दीड वर्ष माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्र (IT sector) अर्थात आयटी कंपन्यांच्या कार्यपद्धतीत (Work Culture) मोठा बदल झाला. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची (Work From Home) संधी दिली. त्यामुळे मोठी मोठी कार्यालयं ओस पडली. कर्मचारी कपात, पगार कपात करण्यात आली. कंपन्यांना मिळणाऱ्या कामातही घट झाली. त्यामुळे अनेक कंपन्यांनी मनुष्यबळ (Human Resources) कमी केलं. आता परिस्थिती सुधारत असल्याने पुन्हा नवीन मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयबीएम अशा अनेक कंपन्या कर्मचारी भरती करत आहेत. भारतातली सर्वांत मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) अर्थात टीसीएसनेदेखील (TCS) 2022च्या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी 77,000 फ्रेशर्सची (Freshers jobs in TCS) नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. या प्रचंड संख्येने होणाऱ्या भरतीचं कारण, अपेक्षा आदी मुद्द्यांवर कंपनीचे एचआर हेड (मुख्य मनुष्यबळ अधिकारी) मिलिंद लक्कड यांनी 'मनीकंट्रोल'ला सविस्तर माहिती दिली. त्यांची ही मुलाखत... - टीसीएस यंदा तब्बल 75 हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. 40 हजारांवरून ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यंदा ही संख्या 1 लाखांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे? - आम्ही आधीच 43हजार फ्रेशर्स घेतले आहेत. आम्ही आणखी 34 हजार जणांना घेणार आहोत. ही संख्या 77 हजारांच्या आसपास आहे. यापुढे आणखी वाढ करायची का याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. गरज असेल तर संख्या वाढण्याचा विचार केला जाईल. - अॅट्रिशन (Attrition) म्हणजे नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण गेल्या सहा तिमाहीमध्ये सर्वाधिक आहे. चौथ्या तिमाहीत अॅट्रिशन दर 7.2 टक्के झाला, तर पहिल्या तिमाहीत तो 8.6 टक्के होता. याबाबतीत तुमच्यासाठी कोणती स्थिती लाभदायी आहे? - 7.2 टक्के अॅट्रिशन कोरोना साथीमुळे तयार झालं होतं. ते नैसर्गिक नव्हतं, तर ते कृत्रिमरीत्या निर्माण करण्यात आलं होतं. आम्ही साधारणपणे 10 ते 11 टक्के अॅट्रिशन रेटवर काम करतो. आमच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून हा अॅट्रिशन रेट कायम आहे. हा रेट 12 ते 13 टक्के असला तरी आम्हाला अडचण होत नाही. तो 14 टक्क्यांपर्यंत वाढला तरी हरकत नाही. 14 टक्के हा खूप आहे आणि नक्कीच काळजी निर्माण करणारा आहे. परंतु आमची एम्प्लॉयर म्हणून असलेली ख्याती, सर्वोत्कृष्ट लोकांना घेण्याचं आणि त्यांच्या विकासाला वाव देण्याचं धोरण यामुळे आम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळतात. पुढील दोन ते तीन तिमाही म्हणजे साधारण पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत आम्ही याच अॅट्रिशन रेटवर कार्यरत राहू. नंतर तो स्थिर होण्यास सुरुवात होईल. हे वाचा- HP Recruitment 2021: HP कंपनीमध्ये IT फ्रेशर्ससाठी मोठी नोकरीची संधी - सध्यादेखील नोकरी सोडण्याचे दर अजूनही 40-50 टक्के आहेत. भरती करणाऱ्यांच्या मते याचा सरासरी दर काय आहे? - सध्याच्या काळात कन्व्हर्जन रेट थोडा कमी झाला आहे, असं मला वाटतं. आमच्यासाठी हा 50 टक्के नाही; पण आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसऱ्या कंपनीतून चांगले कर्मचारी तातडीने घेण्यासाठी येणाऱ्या खर्चात थोडी वाढ झाली आहे; पण सध्याच्या या परिस्थितीत आम्ही त्यात योग्य ताळमेळ साधण्यात यश मिळवलं आहे. - टीसीएस यंदा विक्रमी 77,000 फ्रेशर्सची नियुक्ती करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही दर वर्षी सुमारे 40,000 जणांना संधी देत आहात. मागणी जास्त आहे आणि फ्रेशर्स रुजू होण्यास वेळ लागणार आहे. ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळत आहात? - यासाठी आम्ही एक उपक्रम राबवत आहोत. यामध्ये सातव्या सत्रातल्या विद्यार्थ्यांना एका एक्सप्लोर (Explore) प्रोग्रामद्वारे प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, सॉफ्ट स्किल्स, तसंच सर्वांत जास्त मागणी असणाऱ्या क्लाउड किंवा सिक्युरिटीसारख्या विशिष्ट विषयांचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं. याचं मूल्यमापनही केलं जातं. कोरोना साथीच्या गेल्या 18 महिन्यांच्या काळात आम्ही हे सातत्यानं करत आहोत. यापुढेही ते चालू राहील. परिस्थिती संपूर्णपणे पूर्ववत झाल्यावर आम्ही ते प्रत्यक्ष स्वरूपात आणू. सध्या सुमारे 1,500 विद्यार्थी दर आठवड्याला एक डिजिटल प्रमाणपत्र घेतात. प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार इन्सेटिव्ह्ज दिले जातात. यामध्ये एक निश्चित भत्ता असतोच. त्याशिवाय अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता मिळतो. यात लक्षणीय वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत. हा उपक्रम ते कंपनीत रुजू होण्यापूर्वी 6-7 महिन्यांसाठी असेल. याला आम्ही शिफ्ट-लेफ्ट स्ट्रॅटेजी म्हणतो. यामुळे ते फक्त टीसीएसमध्ये सहभागी होण्यासाठीच नव्हे, तर विशिष्ट युनिटमध्ये काम करण्यास सक्षम असतात. नियोजन, अंमलबजावणी आणि गुंतवणूक या सर्व बाबतीत ते पूर्ण तयार असतात. त्यामुळे फ्रेशर्सची संख्या 40 हजारवरून 75 हजार झाली, तरी आम्ही सर्व नीट हाताळू शकू याची खात्री आहे. - सध्या उत्तम कर्मचारी मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे तुम्ही आतादेखील आणखी पगारवाढ देण्याच्या विचारात आहात का? - गेल्या वर्षीदेखील दोनदा पगारवाढ देणारी आम्ही एकमेव कंपनी आहोत. आता या वर्षीपासून आम्हाला नियमित चक्र निर्माण करायचं आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलपासून आम्ही पगारवाढीचं नियमित चक्र सुरू करू. - मनुष्यबळाचा पुरवठा वाढवण्यासाठी तुम्ही काही वेगवेगळ्या योजना आखत आहात का? पुन्हा परत येण्यासाठी उत्सुक असलेल्या माजी कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधत आहात का? माजी कर्मचाऱ्यांना टीसीएसमध्ये परत येणं कठीण असतं, असं आम्ही ऐकलं आहे. अशा परत येण्यास उत्सुक माजी कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही काही धोरण आखत आहात का? - आम्ही या सर्व मुद्द्यांचा विचार करत आहोत. ज्यांना आमच्या पात्रता चाचणीत थोडक्यासाठी अपयश आलेलं आहे किंवा मुलाखतीत ते थोडक्यासाठी अपात्र ठरले आहेत, अशा व्यक्तींचा आमच्याकडे डेटाबेस आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि 'मागच्या वेळी थोडक्यात तुमची संधी हुकली आहे, आता पुन्हा आम्ही तुम्हाला संधी देऊ इच्छितो आणि यावेळी तुम्हाला यश मिळेल यासाठी मदतही केली जाईल,' असं सांगत आहोत. या गोष्टी सतत सुरू असतात. जे आमच्याकडे येण्यासाठी अतिशय उत्सुक आहेतच पण काही कारणामुळे येऊ शकले नाहीत, ज्यांच्या येण्याची संधी अधिक आहे, अशांचाही आमच्याकडे डेटाबेस आहे. या आधारे आम्ही माजी कर्मचारी परत आणण्याच्या बाबतीत सतत प्रयत्न करत आहोत. हे वाचा- Capgemini Pooled Campus Drive: Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी - गेल्या साधारण दहा वर्षांपासून फ्रेशर्सचा पगार (Salary) वार्षिक सुमारे 3.5 लाखांवर स्थिर आहे. वेगवेगळी डिजिटल कौशल्यं असणाऱ्यांसाठी टीसीएसचं वेतनमान वेगवेगळं आहे, याची कल्पना आहे. आता फ्रेशर्सचा पगार वाढवण्याची काही योजना आहे का? - कर्मचाऱ्यांमध्ये अधिक पगार मिळवण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी अधिक शिकावं, आपली कौशल्यं वाढवावीत अशी आमची इच्छा आहे. त्याकरिता आम्ही त्यांना सर्व पर्याय उपलब्ध करतो. डिजिटल क्षेत्र स्वीकारलं, तर त्यांना 3.5 लाख रुपयांच्या दुप्पट वार्षिक वेतन मिळतं. तुम्हाला तिथे पोहोचायचं असेल, तर त्यासाठी अर्ज करा आणि त्या पातळीवर पोहोचण्यासाठी तीन वर्षांच्या आत तीन संधींचा लाभ घ्या, असं आम्ही सांगतो. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं मूल्य/वेतन स्वतः ठरवण्याची संधी देतो. उमेदवारांनी त्यांची अधिक मिळवण्यासाठीची तयारी दर्शवली तर एक्स्प्लोअरमध्ये आम्ही त्यांना ती संधी देतो. त्यांच्या क्षमतेनुसार आम्ही त्यांना वेतन देतो. यात आणखी वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत. - टीसीएस डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांना कार्यालयात (Office) परत आणण्याच्या विचारात आहे. सध्या कॅम्पस फक्त 50 टक्के क्षमतेने चालू करू शकत असल्यानं तुम्ही ते टप्प्याटप्प्याने करणार आहात का? की रिमोट वर्किंग कायमस्वरूपी राहणार आहे? - आम्ही आमच्या 25 बाय 25 या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो; मात्र त्याच वेळी 100 टक्के रिमोट वर्कवर आमचा विश्वास नाही. न्यू नॉर्मल (New NOrmal) सुरू होण्यापूर्वी आम्ही नॉर्मलवर येण्याचा प्रयत्न करत आहोत. नॉर्मल म्हणजे आम्ही आधी आमच्या बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात आणू. आमचे बहुतेक सर्व वरिष्ठ अधिकारी यापूर्वीच आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा कार्यालयात येऊ लागले आहेत. या वर्षाच्या अखेरीस, आम्ही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना आमच्या कार्यालयांमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. 25 बाय 25 व्हिजन म्हणजे 2025 पर्यंत, टीसीएस कर्मचाऱ्यांपैकी केवळ 25 टक्के कर्मचारी कोणत्याही वेळी टीसीएस सुविधांमधून काम करतील, असं धोरण स्वीकारण्यात आलं आहे. त्यानुसार, 2022 मध्ये 80 टक्के, 2023 मध्ये 60 टक्के आणि 2024 मध्ये 40 टक्के असू शकतं. 2025 पर्यंत ते 25 टक्के उद्दिष्ट गाठण्यात येईल. यामुळे वैयक्तिक दृष्टिकोन आणि ग्राहकांची परिस्थिती यानुसार हा मार्ग आम्ही स्वीकारू. आम्ही हे धोरण राबवण्यासाठी वचनबद्ध आहोत; मात्र 18 महिने व्हर्च्युअली काम केल्यानंतर कामावर परत येणं आणि पूर्वीचं सामाजिक वातावरण तयार करणं आणि नंतर हळूहळू 25 बाय 25 धोरणाकडे जाणं अत्यंत महत्त्वाचे आहे. या पद्धतीतल्या वेतनाबद्दल आम्ही सध्या अजिबात विचार केलेला नाही. - गेल्या दीड वर्षातल्या बदलामुळे उत्तम कर्मचारी घेण्यासाठी लोकेशन (Location) महत्त्वाचं ठरत नव्हतं. रिमोट वर्क पद्धतीमुळे उमेदवारांची निवड शहरानुसार करण्याची गरज पडत नव्हती; मात्र आता हे बदलू शकते. कारण तुम्ही कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात आणण्याचा विचार करत आहात. तुमच्यासाठी हा बदल कसा असेल? - या साथीतून बाहेर पडत असल्याची सध्याची स्थिती म्हणजे या गंभीर वातावरणाला लाभलेली चंदेरी किनार आहे. ग्राहकांसाठी आणि आमच्या कर्मचाऱ्यांसाठीही हा बदल महत्त्वाचा आहे. सर्वांची मानसिकता लक्षणीयरीत्या बदलली आहे. चांगले कर्मचारी मिळवण्यासाठी आम्ही ठिकाणांची मर्यादा ठेवणार नाही. उत्तम उमेदवार कुठेही - पुणे, हैदराबाद, लंडन किंवा न्यूयॉर्क - कुठेही बसून काम करू शकतो. आम्ही त्यांना एका व्यासपीठावर आणू. ग्राहक आणि संस्थेसाठीदेखील हे चांगलं ठरेल. अनेक तज्ज्ञ एकाच वेळी अनेक ठिकाणी अनेक प्रकल्पांवर काम करतील. त्यांचा वेळ प्रीमियम असेल आणि त्यांच्याकडे योग्य कौशल्यं असतील. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा किंवा उत्पादन मिळेल. एखाद्या प्रकल्पासाठी एकाच ठिकाणी सर्वांनी बसून काम करण्याची मानसिकता आता बदलली आहे. आमच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, याची तुम्ही सहज कल्पना करू शकता. यामुळे कामाच्या ठिकाणामुळे नोकरी सोडून जाण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. आज शिकागोच्या बाहेर असलेलं काम न्यूयॉर्कमध्ये कोणी तरी असाइनमेंटवर करत आहे. 'मला न्यूयॉर्कमध्ये नोकरी हवी आहे आणि मी न्यूयॉर्कच्या बाहेर जाऊ शकत नाही. माझ्याकडे पुढची असाइनमेंट नसेल, तर मी कंपनी सोडून जाईन आणि इतर कुठे तरी जॉइन होईन,' असं त्या उमेदवाराने म्हटलं असतं; पण हे आता संपलं आहे. कारण आम्ही त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी अन्य ठिकाणी असाइनमेंट शोधण्यास सक्षम आहोत. हा बदल ग्राहकांसाठी आणि आमच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. - काही वर्षं काम केल्यानंतर नोकरी सोडलेल्या बर्‍याच तज्ज्ञ स्त्रिया (Woman)आहेत. त्या वर्गासाठी तुम्ही काय करत आहात? - अशा वर्गासाठी आम्ही रिबिगिन (Rebegin) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. ज्या महिलांनी करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे आणि ज्यांना आता आपलं करिअर पुन्हा सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक उपक्रम आहे. आम्ही आणि या वर्गातल्या महिला अशा दोघांसाठीही हा उपक्रम लाभदायी ठरण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. आपल्याकडे पुन्हा काम सुरू करण्याची इच्छा असलेला आणि वैविध्यपूर्ण कौशल्यं असलेला वर्ग मोठा आहे. तो चांगला बदल घडवू शकतो. त्यामुळे रिबिगिन उपक्रमातून उत्तम परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. आजपर्यंत रिबिगिन उपक्रमासाठी 4,807 अर्ज आले आहेत. हे वाचा- TCS Smart Hiring Drive: TCS मध्ये फ्रेशर्ससाठी 'या' पदांवर होणार मोठी भरती - दुसरा प्रश्न गिग कामगारांचा (Gig Workforce) आहे. म्हणजे असे बरेच जण आहेत, जे आठवड्यातून दोन दिवस टीसीएससाठी काम करू इच्छितात आणि नंतर उर्वरित दिवस त्यांच्या इतर प्रकल्पांवर काम करतात. त्यांना तुम्ही कशी संधी देता आहात? - आमच्या भविष्यातल्या कामाच्या पद्धतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही आमच्या अंतर्गत प्रोजेक्ट सपोर्टमध्ये काही प्रोटोटाइप केले आहेत. कोअर ग्रुपचा भाग न राहता कोणी तरी स्वतंत्रपणे करू शकेल असे उपक्रम आम्ही निवडत आहोत. ग्राहककेंद्री विक्रीशी निगडित उपक्रमांना प्राधान्य देत असून, तिथे आम्ही काही प्रोटोटाइप तयार करत आहोत, जे विशिष्ट उद्योगांसाठी किंवा ग्राहकासाठी असतील. अशा काही गोष्टी स्वतंत्रपणे करता येणं शक्य आहे. असाइनमेंट तत्त्वावर काम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम देण्याचा विचार सुरू आहे. ही तीन टप्प्यांतली प्रक्रिया आहे. प्रथम अंतर्गत प्रकल्पांसाठी नंतर ते अंतर्गत गिग वर्कफोर्सच्या माध्यमातून आणि नंतर एक्स्टर्नल कर्मचाऱ्यांकडून करून घेणं अशा तीन टप्प्यांत हे काम केलं जाईल.
  First published: