• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • TCS Smart Hiring Drive: TCS मध्ये फ्रेशर्ससाठी 'या' पदांवर होणार मोठी भरती; असं करा अप्लाय

TCS Smart Hiring Drive: TCS मध्ये फ्रेशर्ससाठी 'या' पदांवर होणार मोठी भरती; असं करा अप्लाय

TCS Smart Hiring Drive या नावानं ही भरती घेण्यात येणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 07 ऑक्टोबर: सध्या भारतातील अनेक IT कंपन्या इंजिनिअरिंग आणि इतर पदवीधर फ्रेशर्सना (IT jobs) नोकरीची मोठी संधी देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतातील नामंकित आणि मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS IT jobs for Freshers) लवकरच काही फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. यासाठीची अधिसूचना (TCS Recruitment for Freshers) TCS कडून जारी करण्यात आली आहे. TCS Smart Hiring Drive या नावानं ही भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये 2022, 2021, 2020 या बॅचमधून पास आउट झालेल्या काही उमेदवारांना नोकरीची संधी (TCS latest jobs) मिळणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव TCS मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी Maths, Statistics, Physics, Chemistry, Electronics, Biochemistry, Computer Science, IT या मध्ये BCA, B.Sc पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे 2020, 2021 आणि 2022 या बॅचेसमधून पास आउट झाले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संपूर्ण शिक्षणात 5 किंवा 50% पेक्षा जास्त CGPA  असणं आवश्यक आहे. 2022 मध्ये पास ऊत होणाऱ्या उमेदवारांना एक बॅकलॉग माफ असणार आहे. मात्र त्या आधीच्या बॅचमधील उमेदवारांचा बॅकलॉग नसावा. उमेदवारांची संपूर्ण शिक्षणादरम्यानची गॅप ही दोन वर्षांपेक्षा अधिक नसावी. हे वाचा - Google Off Campus Drive: Google मध्ये 'या' बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी अशी होणार निवड TCS मधील या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला परीक्षा घेऊन आणि त्यानंतर मुलखतीद्वारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेत Verbal Ability वर 24 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 30 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. यानंतर Reasoning Ability वर 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 50 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. यानंतर Numerical Ability वर 26 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 40 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण 80 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी 120 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख -  2 नोव्हेंबर 2021 परीक्षेची तारीख  19 नोव्हेंबर 2021 या पदभरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published: