• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Capgemini Pooled Campus Drive: Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी; इथे करा अप्लाय

Capgemini Pooled Campus Drive: Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी; इथे करा अप्लाय

Pooled Campus Drive 2021 द्वारे ही पदभरती करण्यात येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर: Capgemini  ही नामांकित IT कंपनी संपूर्ण देशभरात IT फ्रेशर्सना (Capgemini freshers jobs) नोकरी देऊ करणार आहे. B.E, B.Tech, M.E, M.Tech, MBA, MCA किंवा कोणत्याही शाखेतून पदवी (Capgemini Pooled Campus Drive) पूर्ण केली असणाऱ्या उमेदवारांनी ही नोकरी दिली जाणार आहे.  Pooled Campus Drive 2021 द्वारे ही पदभरती करण्यात येणार आहे. जाणून घेऊया या भरतीबाबतच्या काही डिटेल्स. कोरोनाकाळात अनेक कंपन्या डबघाईस आल्या, अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. मात्र IT कंपन्यां (Top IT companies jobs) जोमात आहेत. यामुळे IT  कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जॉब्स (Latest Jobs It companies) देण्यास सुरुवात केली आहे. Capgemini च्या Pooled Campus Drive द्वारे ही भरती घेण्यात येणार आहे. यासाठी 2021 ला ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. या उमेदवारांना मिळणार संधी 2021 मध्ये कोणत्याही शाखेतून BE/BTech मध्ये 50% पेक्षा जास्त गुण घेतलेल्या उमेदवारांना या पदभरतीसाठी संधी मिळणार आहे. उमेदवार हे ME/MTech विद्यार्थी केवळ आयटी, माहिती विज्ञान किंवा संगणक विज्ञान प्रवाहातील असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पूर्णवेळ ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे. हे वाचा - Vodafone Recruitment: Vodafone मध्ये या पदांसाठी इंजिनीअर फ्रेशर्सना मोठी संधी अशी होणार निवड या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड करताना पाच राउंड्सम्डझे निवड केली जाणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची Technical Assessment घेतली जाणार आहे. यानंतर Communication skills' test घेतली जाणार आहे. यामध्ये MCQ फॉरमॅटमध्ये इंग्रजीविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. यानंतर Game-based aptitude test घेण्यात येणार आहे. यानंतर Behavioural profiling ही टेस्ट घेतली जाणार आहे. या सर्व टेस्ट पास करून जे उमेदवार निवडले जातील अशा उमेदवारांची HR आणि टेक्निकल मुलाखत होणार आहे. पहिल्या तीन टेस्ट पास करणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे. असं होणार ट्रेनिंग भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला केंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं 8-10 आठवड्यांचं ट्रेनिंग दिलं जाईल. यामध्ये उमेदवारांना विविध टेक्नॉलॉजीवर ट्रेनिंग दिलं जाणार आहे. इनसाईट आणि डेटा डिजिटल तंत्रज्ञान एंटरप्राइझ Applicationप्लिकेशन सोल्यूशन्स क्लाउड इन्फ्रा सेवा वेब टेक्नॉलॉजी टेस्टिंग सिस्टम टेक्नॉलॉजी  या काही विषयांवर सुरुवातीला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. हे वाचा - MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ इथे 7वी पास उमेदवारांसाठी नोकरी या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: