मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story : कचरा वेचणाऱ्यांसह काम करुन कचऱ्यापासून बनवल्या हँडबॅग; आज आहे 100 कोटींचा टर्नओवर

Success Story : कचरा वेचणाऱ्यांसह काम करुन कचऱ्यापासून बनवल्या हँडबॅग; आज आहे 100 कोटींचा टर्नओवर

केवळ एका कल्पनेच्या जोरावर एका महिला उद्योजकाने 100 कोटी रुपयांचा टर्नओवर उभा केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे हजारो कचरा वेचणाऱ्यांना रोजगार मिळाला आहे.

केवळ एका कल्पनेच्या जोरावर एका महिला उद्योजकाने 100 कोटी रुपयांचा टर्नओवर उभा केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे हजारो कचरा वेचणाऱ्यांना रोजगार मिळाला आहे.

केवळ एका कल्पनेच्या जोरावर एका महिला उद्योजकाने 100 कोटी रुपयांचा टर्नओवर उभा केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे हजारो कचरा वेचणाऱ्यांना रोजगार मिळाला आहे.

  नवी दिल्ली, 6 जून : व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ पैशांचीच गरज नसते, तर एका चांगल्या आयडियाचीही गरज असते. केवळ एका कल्पनेच्या, आयडियाच्या जोरावर एका महिला उद्योजकाने 100 कोटी रुपयांचा टर्नओवर उभा केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे हजारो कचरा उचलणाऱ्यांना रोजगार मिळाला असून, 'स्वच्छ भारत मिशन' आणि 'मेक इन इंडिया' या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना चालनाही मिळाली आहे. दिल्लीच्या अनिता आहुजा आणि त्यांचे पती शलभ हे दोघे मिळून ही योजना राबवत आहेत. केनफोलिओजच्या प्रकाशित बातमीनुसार, ते प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुर्नवापर करुन एक्सपोर्ट क्वालिटीची उत्पादनं तयार करतात. भोपाळमध्ये जन्मलेल्या आणि दिल्लीत मोठ्या झालेल्या, स्वतंत्र सेनानी यांची मुलगी अनिता आहुजा यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी वाहिलं आहे. कचरा वेचणाऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. म्हणूनच त्यांनी एक सामाजित उपक्रम सुरू केला, ज्याअंतर्गत त्यांनी कचरा वेचणाऱ्यांकडून प्लास्टिक कचरा एकत्रित करुन, त्यातून जागतिक दर्जाच्या हँडबॅग तयार करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायात उतरण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. परंतु काहीतरी करण्याच्या हेतून त्यांनी कचरा वेचणाऱ्यांसाठी हे काम सुरू केलं. एक दिवस अनिता यांनी आपल्या सारख्याच काही मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना एकत्र घेऊन काही छोटे प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक NGO 'Conserve India' ची सुरुवात केली आणि याच प्रोजेक्ट अंतर्गत कचरा एकत्र करण्यास सुरुवात केली. एकत्र केलेल्या कचऱ्यातून स्वयंपाक घरातील कचरा वेगळा करुन कंपोस्ट करण्यासाठी जवळच्या पार्कमध्ये ठेवला जायचा. एकट्याने हे काम करणं शक्य नसल्याने त्यांनी बाजूच्या दुसऱ्या कॉलनीमधूनही यासाठी मदत घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ही सुरुवात पैसे कमावण्यासाठीची नव्हती.

  (वाचा - सरकारच्या या नियमामुळे तुमच्या पगारावर होणार परिणाम;इन हँड सॅलरी कमी होणार पण...)

  एनजीओ कंजर्व इंडियाने जवळपास 3000 लोकांसह रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनची सुरुवात केली. ही संघटना 2002 मध्ये त्याच्या स्वत:च्या अधिकारांसह पूर्णवेळ वचनबद्ध संस्था बनली. चार वर्ष कचरा वेचणाऱ्यांसह काम करुन त्यांच्या लक्षात आलं, की त्यांचं जीवनमान दारिद्र्य रेषेच्याही खाली आहे. त्यांनी या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम करण्याचं ठरवलं. त्यांनी इंटरनेटवरुन रिसायक्लिंग टेक्नोलॉजीची माहिती घेतली आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. सर्वात आधी त्यांनी विणकाम करत कारपेट्स तयार केले. पण हे प्रोडक्ट अतिशय साधारण दिसत होतं आणि मेहनत जास्त होती. आर्थिकदृष्ट्याही परवडणारं नव्हतं. त्यांना हे प्रोडक्ट विकणं कठीण होऊ लागलं. त्यानंतर त्यांनी प्लास्टिक बॅग तयार करण्याचं ठरवलं आणि हे काम अतिशय चांगलं चालू लागलं.

  (वाचा - दररोज सेव्ह करा केवळ 30 रुपये, मिळेल करोडपती होण्याची संधी)

  अनिता त्यांनी विचार केला, की आधी प्लास्टिक बॅगवर आर्टवर्क करुन त्यानंतर प्रदर्शन करुन पैसे उभारण्याचा प्रयत्न होईल. परंतु त्यांचे पती शलभ यांना हा प्लॅन वर्क होणार नसल्याचं जाणवलं आणि त्यांनी मशीनद्वारा मोठ्या प्लास्टिक शीट्स तयार केल्या.

  (वाचा - Success Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला)

  2003 मध्ये कंजर्व इंडियाने ट्रेड फेअरमध्ये भाग घेतला. टेक्सटाईल मंत्रालयाने त्यांना एक लहानसा बूथ दिला आणि त्यांना यातच 30 लाखांची ऑर्डर मिळाली. अनिता आणि शलभ यांनी ठरवलं, की खरेदीदार थेट एनजीओकडून ऑर्डर घेण्यासाठी इच्छुक नसल्याने, ते कंपनीची मालकी घेतील. प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी कचरा उचलणाऱ्यांना घरोघरी जावं लागत होतं, परंतु ते कमी पडत होतं. तसंच उत्पादनं तयार करण्यासाठी विशेष रंगाच्या प्लास्टिकची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी भंगार विकणाऱ्यांशी संपर्क केला आणि थेट इंडस्ट्रीतूनही प्लास्टिक कचरा मागवण्यास सुरुवात केली. हळू-हळू कंजर्व इंडिया एक ब्रँड बनला. 2020 पर्यंत यांचा टर्नओवर 100 कोटीपर्यंत पोहोचला.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Startup Success Story, Success story

  पुढील बातम्या