Home /News /money /

दररोज सेव्ह करा केवळ 30 रुपये, मिळेल करोडपती होण्याची संधी

दररोज सेव्ह करा केवळ 30 रुपये, मिळेल करोडपती होण्याची संधी

करोडपती बनण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण जर काही इन्व्हेस्टमेंट सिस्टमॅटिकरित्या (Systematic investment) केल्या, तर ते वाटतं तितकं कठीणही नाही. सर्वात मोठा प्रश्न असतो, सुरुवात कशी करावी?

    नवी दिल्ली, 6 जून: आपण करोडपती व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण करोडपती होणं इतकं सोपं आहे का? करोडपती बनण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण जर काही इन्व्हेस्टमेंट सिस्टमॅटिकरित्या (Systematic investment) केल्या, तर ते वाटतं तितकं कठीणही नाही. सर्वात मोठा प्रश्न असतो, सुरुवात कशी करावी? Warren Buffett यांनी केवळ वयाच्या 11 व्या वर्षापासून स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरू केली होती आणि आज ते जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत सामिल आहेत. परंतु दिवसाला 30 रुपये जमा करुनही करोडपती होता येऊ शकतं, याबाबत माहित आहे का? जर तुमचं वय 20 वर्ष असेल, तर दररोज 30 रुपये सेव्हिंग करुन तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत करोडपती होऊ शकता. दररोज 30 रुपये सेव्ह करायचे म्हणजे महिन्याला 900 रुपये. हे पैसे दर महिन्याला SIP (Systematic Investment Plan) मध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजेच 40 वर्षापर्यंत दर महिन्याला केवळ 900 रुपये गुंतवणूक करुन करोडपती बनता येऊ शकतं. समजा, एखाद्याचं वय 20 वर्ष आहे. तो दररोज 30 रुपये असे 40 वर्ष गुंतवणूक करतोय. दर महिन्याला 900 रुपये म्युचुअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय. म्युचुअल फंडमध्ये त्याला सरासरी 12.5 टक्के रिटर्स मिळतात. 40 वर्षानंतर ही रक्कम अतिशय मोठे होते. जर तुम्ही 20 वर्षाहून अधिक वयाचे असाल, तरीदेखील यात इन्व्हेस्ट करू शकता. जर समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात, तर 1 कोटी टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिवसाला 30 रुपयांऐवजी रोज 95 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला 40 वर्षांचा कालावधी अधिक वाटत असेल, तर तुम्ही यात कमी कालावधीसाठीही गुंतवणूक करू शकता. अशात 12 टक्क्यांपर्यंत सरासरी रिटर्स मिळू शकतात. 35 वर्षांसाठी तुम्ही म्युचुअल फंडमध्ये डिव्हिडेंट रिइन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (DRIP) इन्व्हेस्ट केल्यास, याचा रिटर्न रेट 15 टक्के मिळेल. डिव्हिडेंट रिइन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (DRIP) - डिव्हिडेंट रिइन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर जो काही डिव्हिडेंट अर्थात लाभांश मिळतो, तो पुन्हा इन्व्हेस्ट करू शकता. यामुळे इन्व्हेस्ट होणारी रक्कम सतत वाढती राहते आणि रिटर्समध्येही वाढ होते. 2 ते 6 टक्क्यांपर्यंत डिव्हिडेंट दरवर्षी मिळू शकतो. हे पूर्णपणे म्युचुअल फंडच्या टाईपवर आणि स्टॉकवर ठरतं, जो म्युचुअल फंड होल्ड करतो. जोखीम अधिक, तितका फायदाही अधिक - छोट्या मिडकॅप फंड्समध्येही इन्व्हेस्ट करू शकता. हे 25-30 वर्षाहून कमी असतात, परंतु यात जोखीम अधिक असते आणि फायदाही अधिक असतो. RD - दर महिन्याला 5500 रुपये RD करूनही करोडपती होता येऊ शकतं. यासाठी बँकेत RD अकाउंट ओपन करुन त्यात दर महिन्याला पैसे जमा करा. जर तुम्हाला 9 टक्के दराने दरवर्षी व्याज मिळालं, तर केवळ 30 वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता. कमी कालावधीत करोडपती बनण्यासाठी - 25 वर्षांसाठी 9000 रुपये - 20 वर्षासाठी 15000 रुपये - 15 वर्षांसाठी 26400 रुपये - 10 वर्षांसाठी 51500 रुपये जमा करावे लागतील.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या