बारामती, 04 नोव्हेंबर : मुलींच्या शिक्षणाची सुविधा ग्रामीण भागात निर्माण झाल्यानंतर या सावित्रीच्या लेकी किती गगनभरारी घेतात याचा प्रत्यय बारामतीत आला आहे. बारामतीच्या (baramti) डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे (Dr. Anupama Hingane) या कन्येची निवड ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामधील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेनच्या इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA) या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ (international scientist ) म्हणून झाली आहे. त्यांच्या यशाचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी कौतुक केलं आहे.
बारामतीमध्ये आज झालेल्या एका कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. अनुपमा जगन्नाथ हिंगणे यांचा सत्कार करून कौतुक केलं. यावेळी हिंगणे यांचे कुटुंबीय भारावून गेले होते.
डॉ. अनुपमा हिंगणे यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये माध्यमिक व टिसी कॉलेज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर पुण्यात बी.एस्सी. हॉर्टिकल्चर अभ्यासक्रम पूर्णकेल्यानंतर.जिनॅटिक्स व प्लँट ब्रिडींग या विषयात एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली. राहुरी कृषी विद्यापीठात त्यांनी कपाशी या पिकावर पीएच.डी. प्राप्त केली.
टीम इंडियाचा कोच झालेल्या द्रविडची Diwali Bumper, शास्त्रींपेक्षा जास्त मानधन!
पुण्यात एक वर्षाची नोकरी केल्यानंतर हैदराबाद येथे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अँरिड ट्रॉपिक (ICRASAC) यामध्ये शास्त्रज्ञ म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. गेल्या चार वर्षांपासून एशिया प्रोग्राम लीडर म्हणून त्यांनी या विषयात काम केले आहे. जगामधील कडधान्यातील पहिले हायब्रिड वाण विकसीत करण्यामध्ये डॉ. अनुपमा हिंगणे यांचा सिंहाचा वाटा आहे. या शिवाय सर्वात लवकर येणारे (सुपर अर्ली व्हरायटी) तूरीचे वाण जागतिक स्तरावर विकसित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
लग्नानंतर दीड महिन्यात तरुणाला झाला कॅन्सर, पती-पत्नीचा मन हेलावणारा photo
गेल्या सात वर्षांमध्ये जगातील तब्बल 19 देशांना तूरीच्या 118 वेगवेगळ्या व्हरायटीज देण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. अशा प्रकारे काम करणा-या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. व्हिएन्ना येथेही त्या संशोधनाचेच काम करणार असून मानवजातीच्या उपयुक्ततेसाठी प्रामुख्याने त्यांच्या संशोधनाचे काम चालणार आहे. भारतामध्ये काम करताना त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, ओरिसा, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यात संशोधनाचे मोठे काम केलेले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.