मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाचा कोच झालेल्या द्रविडची Diwali Bumper, रवी शास्त्रींपेक्षा मिळणार जास्त मानधन!

टीम इंडियाचा कोच झालेल्या द्रविडची Diwali Bumper, रवी शास्त्रींपेक्षा मिळणार जास्त मानधन!

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) मॅचवेळीच टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची (Team India Head Coach) घोषणा करण्यात आली. राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) मॅचवेळीच टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची (Team India Head Coach) घोषणा करण्यात आली. राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) मॅचवेळीच टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची (Team India Head Coach) घोषणा करण्यात आली. राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 नोव्हेंबर : भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) मॅचवेळीच टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची (Team India Head Coach) घोषणा करण्यात आली. राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड सीरिजपासून राहुल द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक असेल. पुढच्या दोन वर्षांसाठी द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली आहे. खरंतर राहुल द्रविड सुरुवातीला ही जबाबदारी घेण्यासाठी फारसा इच्छुक नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांनी राहुल द्रविडला तयार केल्याचं वृत्त आहे.

राहुल द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक झाला असला तरी अजून बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कोच कोण होणार याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. राहुल द्रविडचे विश्वासू सहकारी पारस म्हांब्रे यांनी बॉलिंग प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे, तर सध्याचे टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही बीसीसीआयला फेर नियुक्तीसाठी अर्ज पाठवला आहे.

राहुल द्रविडला बीसीसीआय वर्षाला 10 कोटी रुपयांचं मानधन देणार आहे. 25 वर्षांपूर्वी कोच म्हणून मदन लाल यांना प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये मिळत होते. बीसीसीआय सध्या विराट कोहलीला वार्षिक कराराचे 7 कोटी रुपये देते, म्हणजेच द्रविडला विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळेल. राहुल द्रविडला मिळणारा हा पगार सध्याचे कोच रवी शास्त्रींना मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त आहे. रवी शास्त्रींना बीसीसीआय 9.5 कोटी रुपये मानधन देत असल्याचं वृत्त आहे. जगातल्या इतर प्रशिक्षकांपेक्षा ही रक्कम सर्वाधिक आहे.

1996-97 मदनलाल कोच

1996-97 साली मदन लाल (Madan Lal) टीम इंडियाचे कोच होते, तेव्हा त्यांना महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळायचा. यानंतर 1999-2000 साली कपिल देव (Kapil Dev) यांना ही जबाबदारी देण्यात आली तेव्हा त्यांना प्रत्येक मॅचचे 4 लाख रुपये आणि अतिरिक्त बोनस दिला जायचा. शास्त्री 2017 साली टीमचे कोच झाले तेव्हा त्यांना वर्षाला 8 कोटी रुपये मिळायचे, 2019 साली यात 20 टक्क्यांनी वाढ झाली.

कुंबळेला 6 कोटी रुपये

2016-17 च्या दरम्यान अनिल कुंबळे (Anil Kumble) टीम इंडियाचा कोच होता, तेव्हा त्याला वर्षाला 6 कोटी रुपये मिळायचे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, यानंतर विराट कोहली आणि कुंबळे यांच्यात वाद झाले, त्यामुळे कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला.

परदेशी प्रशिक्षकांमध्ये जॉन राईट (John Wright) 2000 ते 2005 पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते, तेव्हा त्यांना वर्षाला एक कोटी रुपये पगार मिळायचा. ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी ही जबाबदारी 2005 ते 2007 मध्ये स्वीकारली. चॅपल यांना बीसीसीआय वर्षाला 1.25 कोटी रुपये द्यायची. तर दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन (Garry Kirsten) 2008 ते 2011 पर्यंत टीमचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांना जवळपास 2.5 कोटी रुपये मिळायचे. याशिवाय डंकन फ्लेचर (Duncan Fletcher) 2011-2015 मध्ये टीमचे कोच होते, त्यांनाही वर्षाला 4.2 कोटी रुपयांचं मानधन मिळायचं.

वादामुळे परदेशी कोच नाही

ग्रेग चॅपल यांच्या कार्यकाळात टीमच्या बड्या खेळाडूंसोबत खासकरून सौरव गांगुलीसोबत त्यांचे संबंध खराब राहिले. गांगुलीला टीममधून बाहेर करण्यात आलं. एवढच नाही तर 2007 वर्ल्ड कपच्या पहिल्याच राऊंडमध्ये टीम स्पर्धेबाहेर झाली, त्यामुळे आता बीसीसीआय परदेशी प्रशिक्षक ठेवण्याच्या विचारात नाही.

First published:
top videos

    Tags: Rahul dravid, Team india