मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लग्न झाल्यानंतर दीड महिन्यात तरुणाला झाला कॅन्सर, पती-पत्नीच्या नात्याचा डोळ्यात पाणी आणणारा PHOTO

लग्न झाल्यानंतर दीड महिन्यात तरुणाला झाला कॅन्सर, पती-पत्नीच्या नात्याचा डोळ्यात पाणी आणणारा PHOTO

संकटाच्या काळात जे साथ देतं, तेच खरं नातं असं म्हटलं जातं. या पोस्टकडे, त्यातल्या फोटोकडे पाहून याचीच प्रचिती येते.

संकटाच्या काळात जे साथ देतं, तेच खरं नातं असं म्हटलं जातं. या पोस्टकडे, त्यातल्या फोटोकडे पाहून याचीच प्रचिती येते.

संकटाच्या काळात जे साथ देतं, तेच खरं नातं असं म्हटलं जातं. या पोस्टकडे, त्यातल्या फोटोकडे पाहून याचीच प्रचिती येते.

    मुंबई, 03 नोव्हेंबर : लग्न म्हणजे सात जन्माचं नातं (Married Life) असल्याचं मानलं जातं. ते पती-पत्नींमधलं अतूट नातं असतं. लग्नानंतर दोघांमधलं विश्वासाचं नातं खूप महत्त्वाचं असतं. कितीही संकटं आली, तरी एकमेकांची साथ असेल, तर प्रत्येक संकटावर मात करणं शक्य होतं. पती-पत्नीचं (Husband Wife) एकमेकांवरचं प्रेम, विश्वास कायम असेल तर हे नातं अधिकाधिक दृढ होत जातं. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले, तरी त्यातून ते बाहेर पडतात आणि सुखानं आयुष्य जगतात. या नात्याबद्दलचे अनेक विनोदही व्हायरल होत असतात; पण पती-पत्नीच्या प्रेमाचं नातं किती गाढ असू शकतं, याची उदाहरणंही आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात.

    22 वर्षांच्या एका कॅन्सरग्रस्त व्यक्तीची ट्विटर पोस्ट सध्या (Cancer Post) व्हायरल होत आहे. ही कहाणी वाचून डोळ्यांत पाणी येतं आणि पती-पत्नीनं सुखाबरोबर दु:खातही एकत्र राहणं किती गरजेचं आहे हे समजू शकतं. लग्नानंतर पाचच आठवड्यांत आपल्याला कॅन्सर झाल्याचं त्या व्यक्तीला समजलं आणि पुढचं आयुष्य किती खडतर असू शकतं याची त्याला कल्पना आली.

    ही पोस्ट वाचल्यावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याच्यासाठी सगळेच जण प्रार्थना करत आहेत. @theyoungretiree या अकाउंटवरून ही स्टोरी शेअर झाली आहे. हॉस्पिटलमध्ये पत्नीला मिठी मारतानाचा त्याचा हा फोटो पाहून डोळ्यांत पाणी येतं. एके दिवशी आपल्या नाकातून रक्त वाहत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचंही त्याला समजलं. आपल्या शरीरात प्लेटलेट्स खूपच कमी झाल्याचं त्याला तपासणीनंतर समजलं. त्यानंतर कॅन्सर झाल्याचं निदान झालं. तेव्हा त्याच्या लग्नाला अवघे पाच आठवडे झाले होते; पण या अत्यंत कठीण आणि वेदनादायी प्रसंगात पत्नी आपल्यासोबत आहे याबद्दल त्यानं आभार मानले होते. या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला तिच्या सोबतीची किती गरज आहे, हे फक्त आपल्यालाच माहिती आहे, असं त्याने म्हटलंय, याबद्दलचं वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिलं आहे.

    Team India मध्ये द्रविड पर्व! कोच झाल्यानंतर The Wall ची पहिली प्रतिक्रिया

    ही पोस्ट वाचल्यानंतर तो बरा होण्यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. '21 वर्षांचा असताना कॅन्सरचं निदान झालं आणि त्या वेळेस माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर होती. आता ती माझी पत्नी आहे आणि मी 47 वर्षांचा आहे आणि आम्हाला दोन मुली आहेत,' असं म्हणत एका युझरने त्याला धीर दिला आहे. 'तुझ्यासाठी सतत प्रार्थना करत राहीन. तू तुझी पत्नी आणि कुटुंबीयांबरोबर सुखानं आयुष्य घालवशील,' अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने व्यक्त केली आहे,. सुखाबरोबरचे अनेक क्षण सहज समोर येतात; पण दु:खात साथ दिली तर त्याच्या कायमच्या आठवणी बनतात. या पोस्टला आतापर्यंत दोन लाख 49 लाइक्स मिळाले, तर 18 हजार युझर्सनी ही पोस्ट रिट्विट केली होती. तीन हजार जणांनी त्यावर कमेंट केल्या होत्या. 'गेट वेल सून ब्रदर' असं म्हणत अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आणखीही हजारो जण या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत.

    क्या बात है! लवकरच उभारली जाणार 'साई युनिव्हर्सिटी'; K. V. रामाणी करणार निर्माण

    संकटाच्या काळात जे साथ देतं, तेच खरं नातं असं म्हटलं जातं. या पोस्टकडे, त्यातल्या फोटोकडे पाहून याचीच प्रचिती येते. नवरा-बायकोच्या एकमेकांवरच्या गाढ प्रेमामुळेच कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून किंवा अन्य कोणत्याही संकटातून बाहेर पडायची ताकद मिळते आणि कुटुंबीयांनाही हिंमत मिळते.

    First published: