Home /News /coronavirus-latest-news /

तिसरा डोस फुलप्रूफ: Covishield च्या तिसऱ्या बूस्टर डोसनं कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनपासून होणार बचाव

तिसरा डोस फुलप्रूफ: Covishield च्या तिसऱ्या बूस्टर डोसनं कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनपासून होणार बचाव

अॅट्राझेनकाच्या कोविशिल्ड (covishield vaccine) या covid-19 रोगावरील लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसमुळं अधिक चांगल्या प्रकारे आजारापासून संरक्षण मिळणार आहे. या डोसमुळं कोरोनाच्या सर्व स्ट्रेनपासून बचाव करण्यास सक्षम बनतं, असा दावा आहे

    नवी दिल्ली, 20 मे : ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनकाच्या कोविशिल्ड (covishield vaccine) या covid-19 रोगावरील लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसमुळं अधिक चांगल्या प्रकारे आजारापासून संरक्षण मिळणार आहे. या डोसमुळं कोरोनाच्या सर्व स्ट्रेनपासून बचाव करण्यास सक्षम बनतं. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. हा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही. भारतासह इतर अनेक देशांमध्ये या लसीचे सध्या प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातात. दोन डोस दरम्यान वेगवेगळ्या देशांमध्ये 28 दिवस ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवले जात आहे. फायनान्शिअल टाइम्सच्या एका अहवालात बुधवारी सांगण्यात आलं की, तिसरा बूस्टर डोस विषाणूच्या प्रोटीन विरोधात शरीरात अँटीबॉडीज वाढवतो. या बूस्टर डोसमुळं ज्या अँटीबॉडीज शरीरात तयार होतात त्या कोरोनाविषाणूच्या कोणत्याही स्ट्रेनला रोखण्यास सक्षम आहेत. 2019 च्या एप्रिलपासून या साथीला जगात सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत या विषाणूनं वारंवार आपले स्वरूप बदललं आहे. तसेच पुढे देखील हे स्वरुप आणखी बदलण्याचे म्हणजेच म्युटेशन होण्याची शक्यता आहे. कोरोनाविषाणू विरोधात जगभरात लसीकरण वेगानं होत आहे. या दरम्यान लस उत्पादकांनी प्रत्येक वर्षी बूस्टर डोसची गरज असल्याचा दावा केला आहे. कारण विषाणूच्या स्वरुपात वारंवार बदल होत आहेत आणि ते अधिकाधिक घातक ठरू शकते. हे वाचा - VIDEO: कोरोना काळात लग्नासाठी जमली गर्दी; पोलिसांनी बेडूक उड्यांची शिक्षा देत काढली वरात ऑक्सफर्ड युनिवर्सिटीमध्ये यासंबंधीचा अभ्यास केला आहे. मात्र, अद्याप तो प्रकाशित झालेला नाही, फक्त सूत्रांच्या हवाल्यानं याबाबत माहिती देण्यात येत आहे. हा अहवाल ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेन्काकडून केव्हा प्रकाशित होईल, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. दरम्यान, भारतात सध्या काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, अजूनही मृतांची संख्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आता उतरणीला लागल्याचे सांगितले जात आहे, मात्र तरीही होणाऱया मृत्यूंची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत खूपच जास्त आहे. अजूनही देशात दररोज 4 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळं मृत्यू होत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवणं गरजेचे आहे, वयोवृद्ध लोकांना लसीचे दोन्ही लवकरात लवकर मिळणं गरजेचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या