पाटणा, 20 मे : कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असतानाच काही दिवसांपूर्वी ब्लॅक फंगस (Black Fungus) या आजारानं डोकं वर काढलं आहे. या आजाराचे रुग्ण आता समोर येऊ लागले असतानाच आता आणखी एक व्हाईट फंगस (White fungus) नावाचा अधिक धोकादायक आजार समोर आला आहे. हा ब्लॅक फंगसपेक्षा अधिक धोकादायक (Dangerous) असून यामुळंही फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसंच यामुळं त्वचा, नखं, तोंडाच्या आतील भाग, आतडे, किडणी प्रायव्हेट पार्ट आणि मेंदू अशा सर्वच अवयवांवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
पाटण्याच्या या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं होती. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या. पण कोणत्याही चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही. कोरोनाच्या औषधांचाही त्यांच्यावर परिणा होत नव्हता. त्यानंतर अधिक तपासण्या करण्यात आल्यानंतर हा व्हाईट फंगसचा प्रकार असल्याचं समोर आलं. त्यानंतर अँटि फंगल औषधानं हे रुग्ण बरे झाले. या आजाराचं निदान कठीण आहे. पण अनेक रिपोर्ट याच निगेटिव्ह येतात. पण कोरोनासारखी लक्षणं आणि कफमुळं निघणाऱ्या द्रवाच्या तपासणीतून याचं निदान होतं.
VIDEO: कोरोना काळात लग्नासाठी जमली गर्दी; पोलिसांनी बेडूक उड्यांची शिक्षा देत काढली वरात
हा आजार गंभीर आणि धोकादायक असला तरी यापासून बचाव करणं अत्यंत सोपं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन दिला जात असेल तर त्याच्या उपकरणामध्ये कोणताही बॅक्टेरिया असता कामा नये. ऑक्सिजन सिलिंडरमध्ये ह्युमिडिफायरसाठी स्टर्लाईज वॉटरचा वापर करायला हवा. त्यामुळं फंगसपासून संरक्षण करण्यासाठी ऑक्सिजन घेणाऱ्याला विषाणूची लागण झालेली नसावी. ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसची भीती वाढत असतानाच आता बिहारमध्ये ब्लॅक फंगचेही 4 रुग्ण आढळल्यानं धोका वाढच चालला आहे.
हा आजार होण्याचं कारणही रोग प्रतिकारशक्तीची कमतरता असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच मधुमेह आणि अँटिबायोटिक किंवा स्टेरॉईड दीर्घकाळ घेणाऱ्यांनाही याचा धोका आहे. कॅन्सरच्या रुग्णांनाही या फंगसपासून धोका आहे. नवजात बाळांमध्ये हा आजार डायपर कँडिडोसिस म्हणून समोर येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Coronavirus