जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SBI Report: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! 50 लाख जणांना मिळू शकतो जॉब

SBI Report: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! 50 लाख जणांना मिळू शकतो जॉब

एसबीआयच्या अहवालानुसार यंदा `अशी` असेल जॉब मार्केटची स्थिती

एसबीआयच्या अहवालानुसार यंदा `अशी` असेल जॉब मार्केटची स्थिती

रोजगारासंदर्भात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयच्या (State Bank of India) अर्थशास्त्रज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये मार्केटमधील व्यवहार सुधारतील आणि कंपन्या नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 सप्टेंबर: गेल्या दीड वर्षात कोरोनाने हाहाकार (Coronavirus Pandemic) माजवला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या (Job Loss During Corona Pandemic) आहेत. अनेकांची पगारकपात झाली आहे तर काहींकडे नोकरी असून पगार मिळत नाही आहे. मात्र ही परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयच्या (State Bank of India) अर्थशास्त्रज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये मार्केटमधील व्यवहार सुधारतील आणि कंपन्या नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध करू शकतात. कोरोना पँडेमिकचा परिणाम काहीसा कमी झाल्यानंतर हायरिंग योजनेचा विस्तार होत आहे. अर्थशास्त्रज्ञांनी ईपीएफओ (EPFO) ​​आणि एनपीएस (NPS) द्वारे नियमितपणे जारी केलेल्या मासिक वेतन रजिस्टर डेटाचा संदर्भ दिला. मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्य कांती घोष यांनी एका नोटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आम्हाला आशा आहे की चालू आर्थिक वर्षात लेबर मार्केटमधील कामकाज अधिक चांगले होईल. कंपन्या येत्या काळात भरती योजना (Hiring Plan) राबवतील.’ हे वाचा- 1 ऑक्टोबरपासून 12 तास करावं लागणार काम; ओव्हरटाइम-PF मध्ये होणार बदल? CMIE ची आकडेवारी, ऑगस्टमध्ये 15 लाख जणांनी गमावली नोकरी रोजगारासंदर्भात हा आशेचा किरण अशावेळी दिसत आहे, जेव्हा अनेकांच्या नोकऱ्यांवर संकट आले आहे. अशावेळी ही रोजगाराची शक्यता वर्तवली जात आहे जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बेरोजगारी वाढण्याची आणि अर्थव्यवस्थेत कर्मचाऱ्यांचे योगदान कमी होण्याबाबत चिंता वर्तवली जात आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई (CMIE) च्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात 15 लाख भारतीयांनी नोकरी गमावली आहे. यामध्ये 13 लाख इतकी मोठी आकडेवारी ग्रामीण भागातील आहे. हे वाचा- SBI Alert! आज 3 तास बँकेच्या सेवा नाही वापरू शकणार ग्राहक, वाचा काय आहे कारण एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांच्या अहवालानुसार जून तिमाहीत 30.74 लाख नियमित नोकऱ्या निर्माण झाल्या. यामध्ये 16.3 लाख नवीन नोकऱ्या होत्या, ज्या पहिल्यांदा EPFO ​​किंवा एनपीएशी जोडल्या गेल्या. जर नवीन नोकऱ्या त्याच गतीने वाढत राहिल्या तर 2021-22 मध्ये ही  आकडेवारी 50 लाख पार करू शकते, जी 2020-21 मध्ये 44 लाख होती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: job , Job alert , SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात