जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SBI Recruitment 2021: SBI मध्ये 5237 जागांसाठी बंपर भरती; पाहा कसा कराल अर्ज

SBI Recruitment 2021: SBI मध्ये 5237 जागांसाठी बंपर भरती; पाहा कसा कराल अर्ज

SBI Recruitment 2021: SBI मध्ये 5237 जागांसाठी बंपर भरती; पाहा कसा कराल अर्ज

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार sbi.co.in वर 17 मे 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 एप्रिल: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लेरिकल कॅडरमध्ये ज्यूनियर असोसिएट पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या भरतीसाठी एकूण 5237 वॅकेन्सी आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. नोटिफिकेशनद्वारा इच्छुक उमेदवार केवळ एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतो. उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करेल, त्या राज्याची भाषा येणं गरजेचं आहे. इच्छुक उमेदवार sbi.co.in वर 17 मे 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 27 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. शेवटची तारीख 17 मे 2021 आहे. Pre Exam ट्रेनिंग कॉल लेटर - 26 मे 2021 प्रीलिम्स परीक्षा - जून 2021 मुख्य परीक्षा - 31 जुलै 2021 पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही या जागेसाठी अर्ज करू शकतात. परंतु डिग्री 16 ऑगस्ट 2021 किंवा त्यापूर्वी मिळालेली असावी. वयोमर्यादा - 20 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तसंच यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1993 आधी झालेला नसावा. वयोमर्यादेची गणना 16 ऑगस्ट 2021 पर्यंत केली जाईल.

(वाचा -  तुमच्या जवळपास Aadhaar सेवा केंद्र कुठे आहे? फोनच्या मदतीनं अगदी सहज शोधा सेंटर )

वेतन - 17,900 रुपये ते 47,920 रुपये बेसिक पे 19,900 रुपये निवड प्रक्रिया - सर्वात आधी ऑनलाईन परीक्षा होईल. त्यात पास होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी बोलवलं जाईल. मुख्य परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषेसाठीची परीक्षा द्यावी लागेल. सर्वात आधी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन असणाऱ्या 1 तासाच्या परीक्षेसाठी इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता, तांत्रिक क्षमता यांसंबंधी एकूण 100 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 100 मार्क्सची असेल. अर्ज करण्यासाठी फी - सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी - 750 रुपये एससी, एसटी, दिव्यांग वर्गासाठी कोणतीही फी नाही. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात