मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SBI Recruitment 2021: 600 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

SBI Recruitment 2021: 600 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या संधी शोधत असाल तर हे नोटिफिकेशन वाचा. कुठे आणि कसं करायचं apply?

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या संधी शोधत असाल तर हे नोटिफिकेशन वाचा. कुठे आणि कसं करायचं apply?

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या संधी शोधत असाल तर हे नोटिफिकेशन वाचा. कुठे आणि कसं करायचं apply?

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: देशात गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपासून कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू आहे. यामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू करण्यात आले. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाल्याचं चित्र आहे. अर्थात याला बॅंकिंग क्षेत्रही (Banking Sector) अपवाद नाही. या स्थितीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या (Jobs) गमवाव्या लागल्या. त्यामुळे असे उमेदवार, तसंच नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची म्हणता येईल. कारण भारतीय स्टेट बॅंकेने (SBI) 606 पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया (Recruitment Process) सुरू केली आहे. त्यामुळे ही बॅंकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांकरिता सुसंधी म्हणावी लागेल.

भारतीय स्टेट बॅंक अर्थात एसबीआयनं स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून एकूण 606 स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची (Specialist Cadre Officer) पदं भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात. या पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता 18 ऑक्टोबर 2021 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Sony Off Campus Drive: Sony कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी ऑफ कॅंपस ड्राइव्ह; करा

उमेदवारांची नियुक्ती लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही परीक्षा 15 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी या पदभरती प्रक्रियेकरिता अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

SBI SO Recruitment 2021 – रिक्त पदभरतीचा तपशील

- एकूण पदं – 606

- रिलेशनशिप मॅनेजर – 314 पदं

- रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडर – 20 पदं

- कस्टमर रिलेशन एक्झिक्युटिव्ह – 217 पदं

- इन्व्हेस्टमेंट ऑफिसर – 12 पदं

- सेंट्रल रिसर्च टीम- 2 सीट

- मार्केटिंग – 12 पदं

- डेप्युटी मॅनेजर मार्केटिंग – 26 पदं

SBI SO Recruitment 2021 – असा करा अर्ज

- पदांकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारानं सर्वप्रथम एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जावं.

- होम पेजवर उपलब्ध असलेल्या Latest Announcement या लिंकवर क्लिक करावं

- त्यानंतर RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS ON REGULAR/CONTRACT BASIS वर जावं

- त्यानंतर अनिवार्य असलेली सर्व माहिती भरून नोंदणी करावी.

- नोंदणी झाल्यानंतर अर्ज भरावा.

- अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.

First published:

Tags: SBI, जॉब, बँक