Home /News /career /

Exam Tips: स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'या' टिप्स नक्की करा फॉलो; यश तुम्हालाच मिळणार

Exam Tips: स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'या' टिप्स नक्की करा फॉलो; यश तुम्हालाच मिळणार

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्या फॉलो (Easy tips to follow for crack Competitive exams) करून तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकता.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: दरवर्षी संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास (Study for Competitive Exams) करतात. मात्र या सर्वच विद्यार्थ्यांना यश मिळू शकत नाही. यामागील कारण माहिती आहे? यामागचं प्रमुख कारण म्हणजे अभ्यासाबाबत किंवा त्यासंबंधिचं शून्य नियोजन (Unplanned studies). मात्र जे विद्यार्थी एका विशिष्ट्य पद्धतीनं अभ्यास करतात (Best way to study for Competitive exams) त्यांना नेहमीच यश मिळतं. पण असे विद्यार्थी नेमकं असं करतात तरी काय ज्यामुळे त्यांना यश (Success behind study for Competitive exams) मिळतं? याचबद्दल आज माही तुम्हाला सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्या फॉलो (Easy tips to follow for crack Competitive exams) करून तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. टाइम टेबल बनवणं महत्त्वाचं कोणत्याही अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा आणि परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सेट टाइम टेबल बनवणं. यासाठी तुम्ही केव्हा, काय आणि किती अभ्यास करावा हे अगोदरच ठरवणं महत्त्वाचं आहे. दर अर्ध्या किंवा एक तासाला 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्या. यामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यास सक्षम व्हाल. आधी कठीण विषयांसाठी मेहनत करा आणि नंतर सोप्या विषयांची तयारी करा. जर तुम्ही वेळापत्रकानुसार अभ्यास केला तर तुम्ही सर्व विषयांवर समान लक्ष देऊ शकाल. हे सर्व शक्य फक्त आणि फक्त चांगला टाइम टेबल बनवल्यामुळे होईल. त्यामुळे टाइम टेबल न चुकता तयार करा. हे वाचा- Myntra Recruitment: ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी उजळणी केली नाहीत तर सगळंच विसराल कोणत्याही परीक्षेच्या तयारीमध्ये उजळणीची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. तुम्ही कितीही अभ्यास करा, पण तुम्ही वेळोवेळी उजळणी केली नाहीत तर तुम्ही सर्व विसरण्यास सुरुवात होईल. बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासात किंवा शासकीय नोकरीसाठी अधिक चांगली तयारी करण्यासाठी विषयांची उजळणी करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही जे वाचता किंवा सोडवून बघता ते पुन्हा पुन्हा करा. यामुळे तुम्ही कधीच कोणती गोष्ट विसरणार नाही. पुस्तकं आणि टेस्टमुळे होईल फायदा कोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी आपल्याकडे अभ्यासक्रमानुसार पुरेसं स्टडी मटेरियल असणं महत्त्वाचं आहे.. याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. काही विद्यार्थ्यांना सवय असते की ते अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली पुस्तकंच वाचतात. त्यामुळे त्यांना अधिक ज्ञान मिळू शकत नाही. म्हणूनच निरनिराळे पुस्तकं वाचूनच स्वतःला तयार करा. तसाच मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिकलवरही लक्ष केंद्रित करा. यमाउळें तुम्हाला परीक्षेआधी परीक्षेची तयारी करता येईल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Education

    पुढील बातम्या