जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SBI PO 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर; कधी जारी होणार Admit Cards? समोर आली अपडेट

SBI PO 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर; कधी जारी होणार Admit Cards? समोर आली अपडेट

SBI PO

SBI PO

आज आम्ही तुम्हाला SBI PO प्रवेशपत्र कधी येणार आहे याबद्दल माहिती देणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, PO च्या भरतीसाठी दरवर्षी हजारो उमेदवार परीक्षेची तयारी करतात. या वर्षी देखील SBI PO परीक्षा 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. परीक्षेला जवळपास दोन आठवडे शिल्लक असल्याने उमेदवार त्याच्या प्रवेशपत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. जेणेकरून ते प्रवेशपत्रावरून त्यांच्या परीक्षेची तारीख आणि केंद्राची माहिती तपासू शकतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला SBI PO प्रवेशपत्र कधी येणार आहे याबद्दल माहिती देणार आहोत. क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स विविध मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, SBI पुढील आठवड्यात PO परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. असं असलं तरी, परीक्षेसाठी प्रवेशपत्रे सहसा परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस आधी जारी केली जातात. अशा परिस्थितीत प्रवेशपत्र पुढील आठवड्यातच येऊ शकते. प्रवेशपत्राशी संबंधित अपडेटसाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, ते डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइट, sbi.co.in च्या होम पेजवर देखील सक्रिय केली जाईल. यानंतर, उमेदवार या लिंकला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील आणि त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करू शकतील. हे लक्षात ठेवा की तुम्हाला डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्राची हार्ड कॉपी प्रिंटेड ठेवावी लागेल आणि ती अनिवार्यपणे परीक्षा केंद्रावर घेऊन जावी लागेल. IT कंपन्यांमध्ये येतेय मंदी; पण ‘हे’ स्किल्स असतील तर कोणी तुम्हाला Touch सुद्धा करणार नाही पीओ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने संगणकावर आधारित असेल. ज्यामध्ये उमेदवारांकडून इंग्रजी, गणित आणि तर्क या विषयांचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विभागासाठी 20 मिनिटे दिलेला वेळ आहे. महिन्याचा तब्बल 1,32,000 रुपये पगार हवाय ना? मग परीक्षा देऊच नका; इथे होतेय थेट भरती SBI PO भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली आहे. वेळापत्रकानुसार, प्राथमिक परीक्षा 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी घेतली जाईल. SBI ने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी एकूण 1600 रिक्त जागा आहेत. SBI PO भरती परीक्षेचे प्रवेशपत्र SBI वेबसाइटवर जारी केले जाईल. SBI PO भर्ती 2022 मध्ये, उमेदवारांना तीन परीक्षा द्याव्या लागतील. मुलाखतीसाठी बोलावल्यास, त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) ना 65,780/- - 68,580/- रुपये प्रतिमहिना पगार असेल. उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना विविध शाखांमध्ये पोस्टिंग मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात