मराठी बातम्या /बातम्या /करिअर /क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

भारतीय टेक कंपनी विप्रोनं फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं 'वर्क्र फ्रॉम एनीव्हेअर'चा पर्याय देऊ केला आहे.

भारतीय टेक कंपनी विप्रोनं फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं 'वर्क्र फ्रॉम एनीव्हेअर'चा पर्याय देऊ केला आहे.

भारतीय टेक कंपनी विप्रोनं फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं 'वर्क्र फ्रॉम एनीव्हेअर'चा पर्याय देऊ केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 नोव्हेंबर:  अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. सर्वाधिक कर्माचारी कपात ट्विटर आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांमध्ये झाली आहे. या सर्व कंपन्यांचा आयटी क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे भारतातील आयटी क्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरीही आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. भारतीय टेक कंपनी विप्रोनं फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं 'वर्क्र फ्रॉम एनीव्हेअर'चा पर्याय देऊ केला आहे. ‘टेक गिग’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

विप्रोनं सध्या युजर इंटरफेस डेव्हलपर (UI Developer) पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या उमेदवारांना कुठूनही काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

पद आणि जबाबदाऱ्या:

1) युजर इंटरफेस, ब्रँड-रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाईन आणि नेटिव्ह अॅप्समध्ये विकसित कौशल्य असणं आवश्यक आहे.

2) अॅक्सेसिबल डिझाईनमध्ये अनुभव आवश्यक.

3) पॅटर्न लायब्ररी सांभाळणं, विकसित करणं आणि फिग्मामध्ये डिझाईन सिस्टम तयार करण्याचा अनुभव आवश्यक.

4) वेगवेगळ्या स्कॉड्ससह मोठ्या रि-डिझाईन उपक्रमांचं प्लॅनिंग आणि रचना करण्याची क्षमता आवश्यक.

5) घटक डिझाईन करणं, सर्वोत्तम पद्धतींचं दस्तऐवजीकरण करणं आणि इतरांना मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेसह ऑटॉमिक डिझाईन प्रणाली तयार करण्याचा अनुभव आवश्यक.

6) काम सुधारण्यासाठी सक्रियपणे अभिप्राय मिळवण्याची मोहीम आणि स्वतःसाठी व इतरांसाठी उत्कृष्ट डिझाईन करण्याची क्षमता आवश्यक.

7) डिझाईन सिस्टीम तयार करण्याचा आणि देखरेखीचा किमान चार वर्षांचा अनुभव आवश्यक.

विप्रोनं युजर इंटरफेस डेव्हलपरशिवाय पीएल/ एसक्यूएल डेव्हलपर (PL/SQL Developer) पदासाठीदेखील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. या उमेदवारांना कुठूनही काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

कोण म्हणतं लाखो रुपये कमवण्यासाठी डिग्री लागते? 'हे' करिअर निवडलंत तर व्हाल मालामाल

पद आणि जबाबदाऱ्या:

1) ओरॅकल PL/SQL वापरून हँड-ऑन डेव्हलपमेंटचा किमान सहा-सात वर्षांचा अनुभव आवश्यक.

2) तांत्रिक सहाय्य, प्रॉब्लेम सोल्युशन आणि ट्रबल शूटिंग सपोर्ट प्रदान करण्याची क्षमता आवश्यक.

3) सर्व PL/SQL पॅकेजेसमध्ये आवश्यक असल्यास बदलांचे निरीक्षण करणं, बदलांची शिफारस करणं, संग्रहित कार्यपद्धती प्रदान करणं आणि विविध रिलेशन डेटाबेस तयार व विकसित करण्याची क्षमता आवश्यक.

4) टेबल्स, इंडेक्सेस, डीबी लिंक्स आणि विशेषाधिकार तयार करणं आणि व्यवस्थापित करणं.

5) टेबल्स, इंडेक्सेस, टेबलस्पेसेस, ऑडिटिंग आणि डेटा गुणवत्ता तपासणी तयार आणि व्यवस्थापित करण्यासाठी DBA सह समन्वय साधणं.

6) क्लिष्ट गणना पूर्ण करण्यासाठी जावा डेव्हलपर्सच्या टीमशी समन्वय साधणं.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams