मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IT कंपन्यांमध्ये येतेय मंदी; पण 'हे' स्किल्स असतील तर कोणी तुम्हाला Touch सुद्धा करणार नाही

IT कंपन्यांमध्ये येतेय मंदी; पण 'हे' स्किल्स असतील तर कोणी तुम्हाला Touch सुद्धा करणार नाही

जागतिक मंदीचा सामना करताना प्रत्येक नवख्या इंजिनीअरकडे ही डीप लर्निंग स्कील्स असली पाहिजेत.

जागतिक मंदीचा सामना करताना प्रत्येक नवख्या इंजिनीअरकडे ही डीप लर्निंग स्कील्स असली पाहिजेत.

जागतिक मंदीचा सामना करताना प्रत्येक नवख्या इंजिनीअरकडे ही डीप लर्निंग स्कील्स असली पाहिजेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 डिसेंबर:  अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत मेटा, अ‍ॅमेझॉन, ट्विटर, एचपी यासारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. सर्वाधिक कर्माचारी कपात ट्विटर आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांमध्ये झाली आहे. या दोन कंपन्यांतील हजारो कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इंजिनीअर्स म्हणजेच अभियंत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मंदीच्या काळात आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक इंजिनीअरकडे काही ‘डीप लर्निंग’ स्कील्स असणं गरजेचं आहे. ही स्कील्स असतील तर कदाचित ते आपली नोकरी टिकवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात. ‘डीप लर्निंग’ ही मशीन लर्निंगची एक शाखा आहे. ही शाखा मुख्यतः न्यूरल नेटवर्कवर आधारित असते. जागतिक मंदीचा सामना करताना प्रत्येक नवख्या इंजिनीअरकडे ही डीप लर्निंग स्कील्स असली पाहिजेत. ज्यांच्या मदतीने ते 2023 मध्ये MAANG सारख्या (मेटा, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, नेटफ्लिक्स, आणि गुगल) मोठ्या ठिकाणी नोकरी मिळवू आणि टिकवू शकतील. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

इंजिनीअरसाठी आवश्यक असणारी पाच डीप लर्निंग स्कील्स

1) सायबर सिक्युरिटी: तंत्रज्ञान, कार्यपद्धती आणि सेवांच्या समूहाला सायबर सिक्युरीटी म्हणून ओळखलं जातं. हा समूह नेटवर्क्स व उपकरणांना हॅकर्सच्या अनपेक्षित हल्ल्यांपासून आणि व्हायरसच्या प्रवेशापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार असतो. सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांकडे माहिती सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा आणि असुरक्षितता मूल्यांकन कौशल्यं असणं आवश्यक आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये एथिकल हॅकर्स, सायबर सिक्युरिटी अ‍ॅनॅलिस्ट आणि सिक्युरिटी इंजिनीअर्सना चांगली संधी मिळते.

2) क्लाउड कॉम्प्युटिंग: क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये डेटा वितरण, सॉफ्टवेअर आणि इंटरनेटद्वारे इतर संगणकीय संसाधनांचं संचयन व वितरणाचा समावेश होतो. क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्युशन्सचं नियोजन, डिझाईन, विकास आणि देखभाल करण्यासाठी तज्ज्ञ क्लाउड एक्सपर्ट्स आणि इंजिनीअर्सची आवश्यकता असते. Microsoft Azure आणि Amazon Web Services मध्ये सर्टिफिकेशन टेक क्रेडेन्शियल्स असलेल्या इंजिनीर्सना जास्त मागणी आहे. क्लाउड सिक्युरिटी इंजिनीअर्स, डेटा सायन्स इंजिनीअर्स, क्लाउड आर्किटेक्ट्स आणि क्लाउड कन्सल्टंट यांना MAANG कंपन्यांमध्ये चांगली संधी आहे.

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

3) प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस: दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्याने प्रोग्रॅमिंग लँग्वेज स्कीलची मागणी वाढत आहे. 2028 पर्यंत, प्रोग्रॅमरच्या मागणीत 22 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचं ज्ञान असलेल्या इंजिनीअर्सना MAANG फर्ममध्ये अनेक पर्यायांसह करिअर करता येईल.

4) सिग्नल प्रोसेसिंग टेक्निक्स: भविष्यात सिग्नल प्रोसेसिंगमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये फ्युरिअर अ‍ॅनॅलिसिस, कॉन्व्होल्युशन, टाइम-फ्रीक्वेन्सी अ‍ॅनॅलिसिस आणि इतर डीप लर्निंग कल्पनांचा समावेश असू शकतो. काही सिग्नल घटक शोधताना सिग्नल क्वालिटी, ट्रान्समिशन आणि स्टोरेज कार्यक्षमता सुधारण्यासाठी या संकल्पनांची मदत होते. मंदीच्या काळात सिग्नल प्रोसेसिंग टेक्निक्स असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी टिकून राहील.

What are Your Salary Expectations? प्रश्नामुळे गोंधळून जाऊ नका; असं द्या परफेक्ट उत्तर

5) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट: अनेक प्लॅटफॉर्मसाठी सिस्टिम आणि सोल्युशन्सची निर्मिती व देखभाल करणं म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमसाठी वेबसाइट डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही दोन सामान्य स्पेशलायझेशन आवश्यक असतात. तर, वेब डेव्हलपर्सला सर्ज इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) आणि सर्ज इंजिन मार्केटिंगबद्दल (एसईएम) माहिती असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात, UX डिझायनर आणि अँड्रॉइड मोबाइल डेव्हलपर्सना जास्त मागणी आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities