पुणे, 30 जानेवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांची हिवाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षेतील आजचा पेपर (30 जानेवारी) पुढं ढकलण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार हा पेपर रविवार 5 फेब्रुवारी रोजी पूर्वीच्याच वेळापत्रकातील वेळेनुसार होणार असल्याची घोषणा विद्यापीठानं केली आहे.
का झाला बदल?
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही महाविद्यालये मतदान केंद्र म्हणून जाहीर झाले आहेत. त्यामुळे एका दिवसाचे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतलाय. हा निर्णय विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यासाठी लागू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत विस्तृत माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध केलं आहे. विद्यापीठाचे उर्वरित सर्व पेपर नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचं परीक्षा विभागानं जाहीर केलं आहे.
पुण्यात बोगस इंटरनॅशनल स्कूल, तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या सहीने खळबळ
नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हातात एबी फॉर्म असूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखले केला. त्यानंतर महाविकास आघाडीने दुसऱ्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला.
भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत उमेदवार जाहीर केला नव्हता. मतदानाच्या एक दिवस आधी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याची घोषणा भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Exam, Local18, Pune, Savitribai phule pune university