मराठी बातम्या /बातम्या /करिअर /RRB Recruitment 2021: दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, कोणत्याही परीक्षेशिवाय मिळेल रेल्वेत जॉब

RRB Recruitment 2021: दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, कोणत्याही परीक्षेशिवाय मिळेल रेल्वेत जॉब

Representative Image

Representative Image

केवळ 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्यांसाठीही एक खूशखबर आहे. अशा उमेदवारांना भारतीय रेल्वेत (Indian Railway) नोकरीची संधी (Sarkari Naukri 2021) उपलब्ध झाली आहे.

    नवी दिल्ली, 26 जून: गेल्या काही दिवसांत अनेक सरकारी संस्थांमध्ये (Government Institutes) भरतीच्या अधिसूचना (Notifications) प्रकाशित झाल्या आहेत. त्यामुळे पदवीधर, तसंच उच्चशिक्षितांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोरोनाच्या कठीण काळात (Corona Pandemic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसंच, नव्याने नोकरी शोधणाऱ्यांनाही बराच काळ बेरोजगारच (Jobless) राहण्याची वेळ कोरोना कालखंडामुळे आली आहे. त्यातच सरकारी संस्थांच्या भरतीच्या अधिसूचनांमुळे अनेकांना रोजगाराची संधी (New Job) उपलब्ध झाली आहे. आता केवळ 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्यांसाठीही एक खूशखबर आहे. अशा उमेदवारांना भारतीय रेल्वेत (Indian Railway) नोकरीची संधी (Sarkari Naukri 2021) उपलब्ध झाली आहे. रेल्वेने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

    दक्षिण रेल्वेने (South Railway) आपल्या विविध विभागांत 3378 पदांवर भरती करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या उमेदवारांना sr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 30 जून 2021पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठीची आवश्यक ती सर्व माहितीही त्याच वेबसाइटवर उमेदवारांना उपलब्ध होणार आहे. त्यापैकी काही माहिती येथे देत आहोत.

    हे वाचा-IIT ग्रॅज्युएट ऋषिकेश रेड्डींनी सोडलं नाही IAS चं स्वप्न; चार वेळा ठरले अपयशी पण

    कोणत्या पदांसाठी होणार भरती?

    कॅरिज वर्क्स, पेरम्बूरमध्ये 936, गोल्डनरॉक वर्कशॉपमध्ये 756, तर पोदनूर येथील सिग्नल आणि टेलिकॉम वर्कशॉपमध्ये 1686 अशा एकूण 3378 पदांवर भरती केली जाणार असल्याचं रेल्वेने कळवलं आहे.

    उमेदवारांची पात्रता

    यासाठी इच्छुक उमेदवारांचं वय कमीत कमी 15 वर्षं असलं पाहिजे. तसंच फ्रेशर किंवा Ex-ITI, MLTसाठी अनुक्रमे 22 किंवा 24 वर्षांपेक्षा अधिक वयाचे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

    या पदांवर भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार नाही. Ex-ITI श्रेणीतल्या उमेदवारांची निवड दहावीतल्या आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. तसंच, MLT पोस्टसाठीची निवड बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

    हे वाचा-GD Constable पदांसाठी मेगाभरती; बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करुन भरता येईल अर्ज

    किती आहे शुल्क?

    जनरल कॅटेगरीतल्या उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांना अर्जाचं शुल्क भरावं लागणार नाही, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    फिटर, पेंटर आणि वेल्डर या पदांकरिता अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 50 % गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मेडिकल लॅब टेक्निशियन (MLT) (रेडिऑलॉजी, पॅथॉलॉजी, कार्डिऑलॉजी) या पदांवर अर्ज करण्यासाठी कमीत तमी 50 % गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायॉलॉजी विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसंच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) कोर्स उत्तीर्ण केलेला असणंही गरजेचं आहे.

    First published:

    Tags: Indian railway, Job, Job alert