• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • GD Constable पदांसाठी मेगाभरती; बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करुन भरता येईल अर्ज

GD Constable पदांसाठी मेगाभरती; बातमीत दिलेल्या लिंकवर क्लिक करुन भरता येईल अर्ज

भारतीय निमलष्करी दलात भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवार सध्या एसएससी जीडीच्या नोटिफिकेशनची प्रतिक्षा करीत आहेत.

 • Share this:
  मुंबई 25 जून: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave) देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. याचा फटका सर्व क्षेत्रासह शासकीय नोकरभरतीलाही बसला. भारतीय निमलष्करी दलातील भरती (Indian paramilitary forces) प्रक्रियेबाबतही या कारणांनी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप भरती प्रक्रियेबाबत नोटिफिकेशन (Notification) प्रसिध्द झालेले नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासकीय नोकरभरतीत वयोमर्यादा हा अत्यंत महत्वाचा निकष असतो. आता या नोटिफिकेशन आणि एकूण पद भरती प्रक्रियेला (Recruitment) उशीर होत असून, ती केव्हा सुरु होईल याबाबतही प्रश्नचिन्ह असल्याने इच्छूक उमेदवारांनी वयोमर्यादेच्या निकषांत बदल करावा, अशी मागणी केली आहे. परंतु, या भरती प्रक्रियेशी संबंधित कामगार निवड आयोगाने (SSC) या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नोटिफिकेशन जारी होण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी मागणी देखील केली जात आहे. भारतीय निमलष्करी दलात भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवार सध्या एसएससी जीडीच्या नोटिफिकेशनची प्रतिक्षा करीत आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या कारणामुळे कर्मचारी निवड आयोगाकडून जीडी कॉन्स्टेबल पदांच्या भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जारी करण्याची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. एसएससीच्या जीडी कॉन्स्टेबल भरतीच्या (SSC GD Constable Recruitment) नोटिफिकेशनची तारीख 7 मे पर्यंत तहकूब करण्यात आली होती. या दरम्यान जीडी कॉन्स्टेबल भरतीच्या नोटिफिकेशन च्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छूक उमेदवारांनी आता भरतीसाठीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी केली आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, नोटिफिकेशनला उशीर होत असल्याने अनेक उमेदवार 23 वर्ष असलेली वयोमर्यादा ओलांडतील. मात्र याबाबत आयोगाने कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही. Interview देताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका; अन्यथा हातची नोकरी जाणार 40 हजार पदे असणार एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीअंतर्गत 2021 मध्ये 40 हजार पदे असतील, असा अंदाज आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटल्यावर लगेचच कामगार निवड आयोग जीडी कॉन्स्टेबल भरतीची नोटिफिकेशन प्रसिध्द करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोटिफिकेशन प्रसिध्द झाल्यानंतर इच्छुक उमेदवार एसएससीच्या ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतील. इंग्रजी बोलायला घाबरणारे अभिषेक शर्मा बनले IAS ऑफिसर; कठोर मेहनतीने गाठलं ध्येय येथे होईल भरती या भरती परीक्षेच्या माध्यमातून दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी, सचिवालय, सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. कामगार निवड आयोगाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार भरतीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम 25 मार्चला प्रसिध्द होणार होते. अर्जांची अस्थायी अंतिम तारीख 10 मे होती.
  First published: