जानेवारी महिन्यात त्याने दरदिवशी कमावले 3 हजार कोटी रुपये, जेफ बेजोसलासुद्धा जमलं नाही

जानेवारी महिन्यात त्याने दरदिवशी कमावले 3 हजार कोटी रुपये, जेफ बेजोसलासुद्धा जमलं नाही

अॅमेझॉनचा संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांच्या संपत्तीत जानेवारी महिन्यात 63 हजार कोटींची वाढ झाली. त्यांच्यापेक्षाही जास्त पैसे एका व्यक्तीने महिन्यात कमावले.

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती दिवसाला कोट्यवधी रुपये कमवत असतात. त्यामुळे ते वर्षात आणि आयुष्यात किती रुपये कमावतात याची सर्वसामान्य माणसं कल्पनाच करू शकत नाहीत. तरीही एखाद्या व्यक्तीने महिन्यात 94 हजार 500 कोटी रुपये कमावले असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. ही विक्रमी कमाई केलीय टेस्लाचे संस्थापक अॅलन मस्क या व्यक्तीने.

अब्जाधीशांच्या संपत्तीत दररोज वाढ होते ही सामान्य बाब असली तरी 94 हजार 500 कोटी कमावणे सोपी गोष्ट नाही. अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेजोसने नव्या वर्षात जानेवारी महिन्यात 63 हजार कोटी कमावले आहेत. तर टेस्लाच्या अॅलन मस्क यांनी बेजोस यांनाही मागे टाकलं आहे.

ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी टेस्लाचे शेअर्स 20 टक्के वाढल्याने रेक़र्ड 780 डॉलरवर पोहोचले. 2013 नंतर ही सर्वात मोठी वाढ होती. गेल्या पाच आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 86 टक्के वाढ झाली आहे. यासह अॅलन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये 13.5 अब्ज डॉलर म्हणजेच 94 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

1 लाख कोटींचा टर्नओव्हर असलेल्या फेसबुककडून CEO झुकेरबर्गला मिळतो इतका पगार

अॅलन मस्क डिसेंबरपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये 35 व्या स्थानावर होते. मात्र आता ते 22 स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी मायकल डेल, शेल्डन अडेल्सन, फिल नाइट यांच्यासह अनेक अब्जाधीशांना मागे टाकलं आहे. सध्या त्यांची संपत्ती एकूण 3.08 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.

एका मिनिटाला एवढे पैसे! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचला मिळणारी रक्कम ऐकून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2020 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading