राधाकिशन दमानी बनले भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती, दिग्गजांना टाकलं मागे

राधाकिशन दमानी बनले भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती, दिग्गजांना टाकलं मागे

एका 'आयडिया' मुळे करोडपती बनलेले दमानी आता भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी शिव नाडर, गौतम अदानी या दिग्गजांना मागे टाकलं आहे. दमानींची संपत्ती आता 17.5 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1,25,000 कोटी रुपये झाली आहे. दमानी शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींची संपत्ती 57.4 अब्ज डॉलर इतकी आहेत.

फोर्ब्स रियल टाइम बिलिनिअरीज इंडेक्सनुसार गेल्या आठवड्यात अॅव्ह्येन्यू सुपरमार्केटचे शेअर्स 5 टक्के वाढले होते. यामुळे दमानी यांच्या संपत्तीत वाढ झाली. शनिवारी दमानी यांची नेटवर्थ 17.8 डॉलरपर्यंत पोहोचली होती. तिसऱ्या तिमाहीत अॅव्हेन्यू सुपरमार्केटच्या नफ्यात 53.3 टक्क्यांची वाढ झाली होती. कंपनीला यामध्ये 394 कोटी रुपयांचा फायदा झाला. दमानी यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे शिव नाडर, उदय कोटक आणि गौतम अदानी यांचा नंबर लागतो.

D-Mart चे संस्थापक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani Success Story)रिटेल बिझनेसचे किंग मानले जातात. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीने केली पण एका कल्पनेने त्यांचं आयुष्य बदललं. अवघ्या 24 तासांत त्यांची संपत्ती 100 पटीने वाढली. सुपरमार्केट 'डीमार्ट' चा मालकी हक्क अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टकडे आहे. ही कंपनी देशातली 18 वी मौल्यवान कंपनी बनली आहे. या कंपनीची मार्केटकॅप नेस्ले आणि बजाज फिनसर्व्हपेक्षाही जास्त आहे.

वाचा : SBI देतंय स्वस्त घर आणि दुकान खरेदीची संधी, उरला अगदी कमी अवधी

1980 मध्ये राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजारात एक गुंतवणूकदार म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी D-Mart च्या IPO ची घोषणा केली. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमानी फक्त एका रिटेल कंपनीचे मालक होते पण 21 मार्चच्या सकाळी त्यांच्या कंपनीच्या शेअरचं ट्रेडिंग BSE मध्ये सुरू झालं तेव्हाच त्यांची संपत्ती 100 पटीने वाढली. 21 मार्च 2017 ला शेअर बाजारात लिस्ट झालेल्या अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टचं बाजार मूल्य 39 हजार 988 कोटी रुपये होतं. त्यानंतर या शेअरने 290 पटीने मजल मारलीय.

वाचा : 23 जणांना मिळाला 'ड्रीम जॉब', 9 तास झोपण्याचे मिळणार 1 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: india
First Published: Feb 17, 2020 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading