मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मजूरी करुन शिक्षण पूर्ण केल्यावर झाला पोलीस कॉन्स्टेबल, आता UPSC मध्येही फडकावला झेंडा!

मजूरी करुन शिक्षण पूर्ण केल्यावर झाला पोलीस कॉन्स्टेबल, आता UPSC मध्येही फडकावला झेंडा!

राम भजन कुम्हार

राम भजन कुम्हार

रामभजन यांच्या सुरुवातीच्या शिक्षणातही त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Dausa, India

आशीष कुमार शर्मा, प्रतिनिधी

दौसा, 26 मे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये राजस्थानच्या दौसा येथील बापी या छोट्याशा गावात राहणारा राम भजन कुम्हार यानेही या परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. राम भजन हे दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी नागरी सेवा परीक्षेत 667 वा क्रमांक मिळवला आहे.

रामभजन यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होताच त्यांच्या मूळ गावी बापी येथे जल्लोष सुरू झाला. प्रत्येकजण त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्यात मग्न आहे. आर्थिक दुर्बल असलेल्या राम भजन याने आधी मजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह केला. मग कुटुंबाला आधार दिला. त्यानंतर पोलिसात नोकरी केली आणि आता नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले.

अभ्यासोबत करायचे मजूरी -

राम भजन कुम्हार हे दौसा जिल्ह्यातील बापी गावचे रहिवासे आहेत आणि त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. त्यांचे आई-वडील कामगार वर्गातील आहेत. 2020 मध्ये, त्यांच्या वडिलांचा दम्याच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. रामभजन यांच्या सुरुवातीच्या शिक्षणातही त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. अशा परिस्थितीत राम भजन हा स्थानिक बापी औद्योगिक परिसरात मजूर म्हणून कामाला जात असे, त्यातून त्यांना अभ्यासासाठी पैसे मिळायचे. यासोबतच कुटुंबाला आर्थिक मदतही केली. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर रामभजनची दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली.

UPSC Result 2022 : कोचिंगसाठी सायबर कॅफे चालवून जमवले पैसे, बस चालकाच्या मुलानं पास केली UPSC परीक्षा

2015 मध्ये सुरू केली तयारी -

2015 पासून त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्रेरणेने, पोलिसांच्या नोकरीच्या काळात, त्यांनी नागरी सेवांसाठी तयारी सुरू केली. दरम्यान, त्यांनी दिल्लीत मार्गदर्शनाच्या आधारे कोचिंगही घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी स्वयंअध्ययनाच्या रूपाने तयारी सुरू ठेवली. 2018 मध्ये प्रथमच, प्रीलिअम्स पास केली आणि पण मुख्य परिक्षेत त्यांना अपयश आले. यानंतर सतत मेहनत आणि संयमाने तयारी करत राहिले. शेवटी नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक 667 मिळवत मोठे यश मिळवले.

‘माझ्या मुलाने खूप कष्ट केले’

दुसरीकडे, राम भजन यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची आई खूप आनंदी आहे. राम भजन यांनी खूप दु:ख सहन केले आहे, असे त्यांच्या आई सांगतात. मोलमजुरी करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि आज त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देवाने दिले आहे. रामभजन यांच्या पत्नी अंजलीचा संघर्षसुद्धा काही कमी नाही. लग्नानंतर अंजली यांनी राम भजन यांच्या कुटुंबाची काळजी घेतली. त्यांचा हा प्रवास आजच्या तरुणासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Delhi Police, Inspiring story, Local18, Police, Success Story, UPSC