मराठी बातम्या /बातम्या /करिअर /काय दिवस आलेत राव! इथे बेरोजगारी संपेना अन् तिथे उंदीर पकडण्याचे मिळताहेत 1.3 कोटी रुपये

काय दिवस आलेत राव! इथे बेरोजगारी संपेना अन् तिथे उंदीर पकडण्याचे मिळताहेत 1.3 कोटी रुपये

प्रशासनाने उंदीर पकडण्याचं अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत या व्यक्तीला शहरातील उंदीर पकडण्याचं काम करावं लागणार आहे.

प्रशासनाने उंदीर पकडण्याचं अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत या व्यक्तीला शहरातील उंदीर पकडण्याचं काम करावं लागणार आहे.

प्रशासनाने उंदीर पकडण्याचं अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत या व्यक्तीला शहरातील उंदीर पकडण्याचं काम करावं लागणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 डिसेंबर: सध्याच्या काळात नोकरी मिळणं अवघड झालं आहे. अर्थात त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामुळे अनेक बरोजगार तरुण मिळेल ते काम करून पैसा मिळवतात. सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये स्थानिक प्रशासनाकडून एका अनोख्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला वर्षाला 1.3 कोटी रुपये पगार दिला जाणार आहे. मात्र या व्यक्तीला जरा हटके आणि 24 तास, सात दिवस काम करावं लागणार आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने उंदीर पकडण्याचं अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत या व्यक्तीला शहरातील उंदीर पकडण्याचं काम करावं लागणार आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती दिली आहे.

दुष्काळात तेरावा महिना! जगभरातील कंपन्यांनंतर देशातील 'ही' कंपनी देणार 600 कर्मचाऱ्यांना नारळ

तुम्हाला उंदरांची किळस वाटत असेल, तुम्हाला ते आवडत नसतील तरी हरकत नाही. पण तुमचे संवाद कौशल्य चांगलं असेल आणि स्वभाव खोडकर आणि नीच असेल तर या गुणांमुळे तुम्हाला तब्बल 1.3 कोटी रुपये पगार मिळू शकतो. सध्या न्यूयॉर्क शहरात उंदरांची मोठी दहशत आहे. त्यामुळे तेथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे या शहरात `रॅट जार` या पदासाठी भरती केली जाणार आहे.

या पदासाठी अधिकृत जॉब टायटल `डायरेक्टर ऑफ रोडेंट मिटिगेशन` अर्थात `उंदीर नियंत्रण संचालक` असं आहे. या नोकरीला `रॅट जार` असंही नाव देण्यात आलं आहे. या पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवाराला 1,20,000 ते 1,70,000 डॉलर म्हणजेच 97 लाख ते 1.3 कोटी रुपये वर्षिक पगार मिळणार आहे.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता रेल्वे भरतीच्या 'या' पदांसाठी UPSC आयोजित करेल परीक्षा; असं असेल पॅटर्न

न्यूयॉर्क शहरातील प्रशासनाकडून उंदरांचा सामना करण्यासाठी अनेक दिवसांपासून कारवाई केली जात आहे. पण त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याचं चित्र आहे. पार्क, फुटपाथ तसंच अन्य ठिकाणी वारंवार उंदीर दृष्टीस पडत आहेत. माजी महापौरांनी कोट्यवधी रुपये खर्च करून उंदरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. आता उंदरांमुळे अनेक आजार फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांच्या प्रशासनाने उंदरांना पकडणाऱ्या व्यक्तीच्या नियुक्तीसाठी अधिकृत पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. यातून शहरात सुरू असलेले अभियान यशस्वी व्हावे, असा देखील उद्देश आहे.

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

ही नोकरी 24/7 असेल. त्यामुळे उमेदवार पूर्णपणे सक्षम असावा. उमेदवाराकडे कामासाठी सतत उत्सुक असावा आणि कुठेतरी तो रक्तासाठी आसुसलेला असावा. उंदरांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय उमेदवाराला माहिती असावेत ज्यात उंदरांविरुद्ध मोहिमेत सुधारणा करणं, डाटा संकलन, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन, कचरा व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर उंदीर मारणं या उपाययोजनांचा समावेश आहे. उमेदवाराची वृत्ती कणखर असावी. त्याची प्रतिमा खोडकर आणि काहीशी नीच माणसासारखी असावी. उमेदवाराकडे पदवी असावी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा पाच ते आठ वर्षांचा अनुभव असावा. या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला सिटी हॉलमध्ये लोकांना संबोधित करावे लागेल. त्यामुळे त्याला विनोदाची उत्तम जाण असावी, अशा या जॉबसाठी अटी आणि शर्ती आहेत.

First published:

Tags: America