मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! AIIMS मध्ये फॅकल्टीच्या तब्बल 44% जागा रिक्त; आता आरोग्य मंत्रालय अशी करणार भरती

मोठी बातमी! AIIMS मध्ये फॅकल्टीच्या तब्बल 44% जागा रिक्त; आता आरोग्य मंत्रालय अशी करणार भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान

अखिल भारतीय आयुर्विज्ञान

प्रमुख आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांसाठी केंद्रीकृत भरती सुरू करण्याच्या विचार केला आहे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च:  भारतभरातील एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था या प्रमुख आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांसाठी केंद्रीकृत भरती सुरू करण्याच्या विचार केला आहे. सध्या मंत्रालय या भरतीच्या शक्यतेची तपासणी करत आहे. त्यासाठी, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य मंत्रालयातील पीएमएसएसवायचे अतिरिक्त सचिव, नवी दिल्ली एम्सचे संचालक यांचा समावेश असलेली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.

"भुवनेश्वर एम्स येथे 8 जानेवारी रोजी झालेल्या केंद्रीय संस्था मंडळाच्या (सीआयबी) बैठकीनंतर, या कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीकृत भरती सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी करण्यासाठी आणि विविध एम्समधील फॅकल्टी व नॉन-फॅकल्टींच्या भरती प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे," असं 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

देशभरातील 18 नवीन एम्समध्ये सुमारे 44 टक्के फॅकल्टी पदं रिक्त आहेत. राजकोट एम्समध्ये मंजूर 183 पदांपैकी फक्त 40 फॅकल्टी मेंबर्स आहेत. राजकोट एम्स ही सर्वात कमी फॅकल्टी असलेली संस्था आहे, असं आरोग्य मंत्रालयानं गेल्या वर्षी लोकसभेत सांगितलं होतं. राजकोट एम्सपाठोपाठ आता विजयपूर आणि गोरखपूरमध्ये एम्समध्येदेखील मंजूर पदांच्या तुलनेत सर्वात कमी फॅकल्टी मेंबर्स आहेत.

एमबीबीएस विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरकारनं नव्यानं तयार केलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी (एम्स) पुरेशा फॅकल्टी मेंबर्सच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

"केंद्रीय भरती प्रणाली ही, फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांची नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत करेल. याशिवाय, या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचं एका एम्समधून दुसऱ्या एम्समध्ये ट्रान्सफरदेखील सुलभ होईल. सध्या देशभरातील एम्स वैयक्तिक पातळीवर आपल्या कर्मचाऱ्यांची भरती करतात. या प्रक्रियेत असं निदर्शनास आलं आहे की, प्रतिभावान डॉक्टर आपल्या राज्याबाहेर जाण्यास नाखूश आहेत, असं एका अधिकृत सूत्रानं सांगितलं आहे.

CCL Recruitment 2023: तब्बल 1,50,000 रुपये सॅलरी आणि सरकारी जॉब; अजून काय हवं? संधी सोडू नका

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 18 नवीन एम्समध्ये 4 हजार 026 मंजूर पदांपैकी केवळ 2 हजार 259 पदं भरण्यात आली आहेत.

नव्यानं स्थापन झालेल्या एम्समध्ये फॅकल्टी संख्या वाढवण्यासाठी केलेल्या तरतुदींची यादी मांडत मंत्रालयानं आपल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, प्रत्येक नवीन एम्समध्ये एक स्थायी निवड समिती (एसएससी) तयार करण्यात आली आहे. जेणेकरून रिक्त पदे लवकर भरता येतील. फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांच्या थेट भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षांवरून 58 वर्षे करण्यात आली आहे.

सरकारी वैद्यकीय महाविद्यालये किंवा संस्थांमध्ये सेवा देणार्‍या प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीवर एम्समध्ये घेण्यासाठीदेखील परवानगी देण्यात आली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये किंवा संस्थांमधील सेवानिवृत्त प्राध्यापकांना त्यांच्या वयाच्या सत्तरीपर्यंत करारानुसार नियुक्ती देण्यात आली आहे. या शिवाय, भारताच्या नागरिकत्वाचं कार्ड असलेल्या परदेशी नागरिकांनाही (ओसीआय) नोकरीत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जॉब करताना उच्च शिक्षण घ्यायचंय? टेन्शन नको; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

या शिवाय, अध्यापन आणि शैक्षणिक हेतूंसाठी नव्याने स्थापन झालेल्या एम्समध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांना काम करण्याची परवानगी देण्यासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी योजना तयार करण्यात आली आहे. लोन बेसिसवर या फॅकल्टींना एका विभागातून दुसऱ्या विभागात घेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. अशी पदं कंत्राटी पद्धतीनं भरली जाऊ शकतात. ही प्रक्रिया जलदगतीने मार्गी लावण्यासाठी एक वर्षाच्या वैधतेसह भरतीची जाहिरात देण्यात आली आहे.

देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती

दिल्ली एम्स शिवाय, बिहार (पाटणा), छत्तीसगड (रायपूर), मध्य प्रदेश (भोपाळ), ओडिशा (भुवनेश्वर), राजस्थान (जोधपूर) आणि उत्तराखंड (ऋषिकेश) येथील सहा एम्सना प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात मान्यता देण्यात आली होती. या संस्था सध्या पूर्णपणे कार्यरत आहेत.

2015 ते 2022 दरम्यान स्थापन झालेल्या 16 एम्सपैकी 10 संस्थांमध्ये एमबीबीएस वर्ग आणि बाह्यरुग्ण विभागाच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तर, आणखी दोन संस्थांमध्ये फक्त एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित चार संस्था सध्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

First published:
top videos

    Tags: AIIMS, Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams