मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

Study Abroad: अवघ्या 5 लाख रुपयांमध्ये परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे का? काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

काय म्हणतात एक्सपर्ट? वाचा

एखाद्या विद्यार्थ्याकडे अवघे 5 लाख रुपये असतील तर त्याला शिक्षण घेणं शक्य होईल का? या प्रश्नावर एक्सपर्ट्सनं उत्तर दिलं आहे. चला तर बघूया काय म्हणताहेत एक्सपर्ट्स...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च: दरवर्षी हजारो विद्यार्थी बारावीनंतर परदेशी महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी काहींनाच यश मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्ज योग्य पद्धतीने न भरणे. परदेशात शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. याद्वारे देश-विदेशात नोकऱ्या आणि करिअर निर्माण करणे सोपे असतानाच इतर देशांतील लोकांशी ताळमेळ साधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वही योग्य पद्धतीने विकसित होते. विद्यार्थ्यांकडे परदेशात शिक्षणासाठी पैसेच नसतात. परदेशात शिक्षण म्हंटलं की लाखो रुपये खर्च होतात. मग एखाद्या विद्यार्थ्याकडे अवघे 5 लाख रुपये असतील तर त्याला शिक्षण घेणं शक्य होईल का? या प्रश्नावर एक्सपर्ट्सनं उत्तर दिलं आहे. चला तर बघूया काय म्हणताहेत एक्सपर्ट्स...

CCL Recruitment 2023: तब्बल 1,50,000 रुपये सॅलरी आणि सरकारी जॉब; अजून काय हवं? संधी सोडू नका

काही एक्सपर्ट्सच्या किंवा परदेशात शिक्षणाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परदेशात म्हणजे अमेरिका, कॅनडा किंवा इतर मोठ्या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो. मात्र जर एखाद्या विद्यार्थ्याकडे अगदीच कमी पैसे असतील तर असे विद्यार्थी अशा देशांची निवड करू शकतात जिथे कमी पैशांमध्ये उत्तम शिक्षण मिळू शकेल.

अनेक मोठ्या देशांमध्ये शिक्षण शुल्क आणि राहण्याचा खर्च लक्षणीय जास्त असू शकतो. मात्र काही देशांमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे जेथे राहण्याची किंमत आणि शिक्षण शुल्क कमी आहे.

जॉब करताना उच्च शिक्षण घ्यायचंय? टेन्शन नको; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

काही देश जे शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात

तुर्की

इटली

सौदी अरेबिया

दक्षिण कोरिया

मलेशिया

देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती

लक्षात ठेवा की तुम्ही निवडलेल्या विद्यापीठ आणि कोर्सनुसार राहण्याची किंमत आणि शिकवणी फी मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, त्यामुळे विविध पर्यायांच्या खर्चाचे सखोल संशोधन करणे आणि त्यांची तुलना करणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, आपण परदेशात आपल्या अभ्यासासाठी निधी मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती किंवा विद्यार्थी कर्ज यासारखे आर्थिक सहाय्य मिळविण्याचा विचार करू शकता.

तसंच जर एखाद्या विद्यार्थ्याचं बजेट अगदी कमी असेल तर असे विद्यार्थी परदेशात पार्ट टाइम जॉब करून कॉलेजची ट्युशन फी भरू शकतात. तसंच एज्युकेशन लोन किंवा स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात जेणेकरून त्यांना शिक्षणाचा खर्च कमी करता यावा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Education, Job Alert