मराठी बातम्या /बातम्या /करिअर /जॉब करताना उच्च शिक्षण घ्यायचंय? टेन्शन नको; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

जॉब करताना उच्च शिक्षण घ्यायचंय? टेन्शन नको; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीजबद्दल सांगणार आहोत आणि त्यांची माहिती देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च: आजकालच्या काळात प्रत्येकाचंच आयुष्य धावपळीचं आणि चॅलेंजेसनं भरलेलं आहे. त्यामुळे नोकरी करणं आवश्यक झालंय. पण अनेकदा नोकरीच्या मागे धावत असताना आपण शिक्षणात मागे पडतो. तसंच नोकरी सुरू असतानाही आपल्याला काही शिकण्याची इच्छा असते. मात्र यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. याचसाठी काही विद्यापीठांकडून डिस्टन्स लर्निंग कोर्सेस घेतले जातात. यामध्ये पार्ट टाईममध्ये कुठलंही शिक्षण घेण्याची सुविधा असते. तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीजबद्दल सांगणार आहोत आणि त्यांची माहिती देणार आहोत.

डिस्टन्स लर्निंग म्हणजे काय?

साधारणतः डिस्टन्स लर्निंगमध्ये ऑनलाईन शिक्षण किंवा पार्ट टाइम शिक्षणाचा समावेश होतो. डिस्टन्स लर्निंग करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन दिवसभर क्लासेस करण्याची गरज पडत नाही. तुमचा वेळ वाचवण्यासाठी ही शिक्षणाची पद्धत आहे. यात तुम्हाला नोकरी करता करता किंवा व्यवसाय करताना शिक्षण घेता येतं. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही शहराची मर्यादा नाही. जगभारतील कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून  तुम्ही डिस्टन्स लर्निंग करू शकता.

महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महापालिकेत ओपनिंग्स; करा अप्लाय

या आहेत महाराष्ट्रातील टॉप Distance Learning Universities

1. डॉ. डी, वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई, महाराष्ट्र (Dr DY Patil University, Navi Mumbai, Maharashtra)

2. भारती विद्यापीठ, पुणे, महाराष्ट्र (Bharti Vidyapeeth University, Pune, Maharashtra)

3. मुंबई विद्यापीठ, मुंबई, महाराष्ट्र (University of Mumbai, Mumbai, Maharashtra)

4. सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंग, पुणे, महाराष्ट्र (Symbiosis Centre for Distance Learning, Pune, Maharashtra)

5. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र (Shivaji University, Kolhapur, Maharashtra)\

1-2 नव्हे तब्बल 5000 जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; सेंट्रल बँकेत नोकरीची संधी सोडूच नका; करा अप्लाय

6. टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई, महाराष्ट्र (Tata Institute of Social Sciences, Mumbai, Maharashtra)

7. बालाजी आधुनिक व्यवस्थापन संस्था, पुणे, महाराष्ट्र (Balaji Institute of Modern Management, Pune, Maharashtra)

8. वायसीएम मुक्त विद्यापीठ, नाशिक, महाराष्ट्र (YCM Open University, Nashik, Maharashtra)

9. एसआरटीएम युनिव्हर्सिटी, नांदेड, महाराष्ट्र (SRTM University, Nanded, Maharashtra)

10. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे, महाराष्ट्र (Sinhgad Technical Education Society, Pune, Maharashtra)

11. संत गागडे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, महाराष्ट्र (Sant Gagde Baba Amravati University, Amravati, Maharashtra)

12. इंदिरा आंतरराष्ट्रीय डिस्टन्स लर्निंग अकादमी, पुणे, महाराष्ट्र (Indira International Distance Education Academy, Pune, Maharashtra)

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Job Alert