मुंबई, 20 मार्च: सेंट्रल कोल फिल्ड्स लिमिटेडने मायनिंग अॅडव्हायझर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. हे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहे. सेंट्रल कोल फिल्ड रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, या प्रक्रियेत केवळ एक जागा भरली जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराची 1 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल. 'study cafe' ने या संदर्भात वृत्त दिलंय.
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 65 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत. निवडलेल्या उमेदवाराला कॉन्ट्रॅक्टच्या कालावधीत 15 दिवसांची रजा मिळेल. उमेदवाराची निवड वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेला किंवा त्या पूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. 31 मार्च 2023 किंवा त्या पूर्वी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचले नाहीत, तर ते स्वीकारले जाणार नाहीत. या पदाचं नाव, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतन, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर सर्व तपशील जाणून घेऊयात.
रिक्त पदाचं नाव
सेंट्रल कोल फिल्ड रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार मायनिंग अॅडव्हायझर पदासाठी 1 रिक्त जागा भरली जाणार आहे.
वयोमर्यादा
या पोस्टसाठी अर्ज करणारे उमेदवार कॉन्ट्रॅक्ट कालावधीत 65 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत.
कोणतीच परीक्षा नाही थेट HPCL मध्ये भरती; संधी सोडू नका; उद्याची शेवटची तारीख; करा अर्ज
कॉन्ट्रॅक्टचा कालावधी
निवड झालेल्या उमेदवाराची एका वर्षासाठी नियुक्ती केली जाईल.
पगार
या पदासाठी 37,500 ते 1,50,000 यादरम्यान पदाच्या श्रेणीनुसार पगार देण्यात येईल.
Resume अवघ्या काही मिनिटांमध्ये अपडेट करायचाय? मग वापरा 'PFK' पद्धत; पण हे नक्की आहे तरी काय?
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल.
आवश्यक कागदपत्रं
- वयाचा पुरावा
- सेवानिवृत्तीची नोटीस
- पेन्शन पेमेंट ऑर्डरची कॉपी
- पात्रता प्रमाणपत्र
- अनुभवाचा पुरावा देणारी कागदपत्रं
NTPC Recruitment: 10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी; इतका मिळेल पगार; करा अप्लाय
अर्ज कसा करायचा
सेंट्रल कोल फिल्ड रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सर्व संबंधित कागदपत्रांसह भरलेला अर्ज पाठवावा. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
एचओडी (कार्मिक-ईई), कार्यकारी आस्थापना विभाग, सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड मुख्यालय, दरभंगा हाऊस, कुचेरी रोड, रांची – ८३४०२९ (झारखंड)
अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचायला हवेत. त्यानंतर पोहोचलेले अर्ज रिजेक्ट केले जातील, अशी माहिती सेंट्रल कोल फिल्ड रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams