Home /News /career /

नो टेन्शन! आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही IITमध्ये मिळणार प्रवेश; जाणून घ्या प्रक्रिया

नो टेन्शन! आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही IITमध्ये मिळणार प्रवेश; जाणून घ्या प्रक्रिया

आभियांत्रीकीचं शिक्षण घेण्याऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं IIT मधून शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. पण आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येणार आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर: आभियांत्रीकीचं शिक्षण घेण्याऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं IIT मधून शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. IIT मधून शिक्षण घेत मोठं नाव करण्याची अनेकांची इच्छा असते. पण हे स्वप्न अनेकांना पूर्ण करता येत नाही. पण ज्यांची शैक्षिणिक पार्श्वभूमी नॉन टेक्निकल आहे, अशांना तर IIT मध्ये प्रवेश मिळण्याचा सवालच निर्माण होतं नाही. पण आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येणार आहे. कारण अशा विद्यार्थ्यांना आयआयटीतून डिझाईन आणि मॅनेजमेंट सारखे कोर्स करता येणार आहेत. बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des) बॅचलर ऑफ डिझाईन हा चार वर्षांचा पदवीधर कोर्स आहे. ज्यामध्ये डिझाईन प्रिन्सिपल, इमेज आणि फोटोग्राफीचं शिक्षण दिलं जातं. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला केवळ अंडरग्रेजुएट कॉमन एन्ट्रान्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन (UCEED) ही टेस्ट द्यावी लागेल. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला थेट आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण करता येणार आहे. UCEED ही राष्ट्रीय स्तरावरील एन्ट्रान्स एक्साम असून आयआयटी बॉम्बेद्वारे ही परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, डिझाइन थिंकींग आणि प्रॉब्लेम सॉल्वींग, ऑब्जरव्हेशन  आणि डिझाइन सेन्सिटीव्हीटी, विश्लेषणात्मक आणि तार्किक विश्लेषण, भाषा आणि क्रिएटीव्हीटी, पर्यावरण आणि सामाजिक जागरूकता यावर अधारित प्रश्न विचारले जातात. सध्या, आयआयटी बॉम्बे (37 जागा), आयआयटी हैदराबाद (20 जागा) आणि आयआयटी गुवाहाटी (56 जागा) या तीन आयआयटीमध्ये हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग, जबलपूर (66 जागा) येथे देखील हा कोर्स उपलब्ध आहे. 12 वी उत्तीर्ण केलेला किंवा 24 वर्षांपेक्षा कमी वय असणारा कोणताही विद्यार्थी UCEED परीक्षा देऊन या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. हेही वाचा-जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 25 जागांसाठी भरती; 10,000 रुपये मिळणार पगार मास्टर ऑफ डिझाईन (M.Des) मास्टर ऑफ डिझाईन हा दोन वर्षांचा पदव्युत्तर कोर्स आहे. जो डिझाईन कोर्समध्ये स्पेशलायझेश करण्यासाठी आहे. आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील या कोर्सला प्रवेश घेता येणार आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी देखील UCEED ही प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग, जबलपूर आयआयटी बॉम्बे, आयआयटी हैदराबाद, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी कानपूर याठिकाणी हा कोर्स उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारानं किमान तीन वर्षांची पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. हेही वाचा-NDA Exam 2021: दरवर्षी पेक्षा वेगळ्या पद्धतीनं होणार NDA ची परीक्षा? जाणून घ्या MA स्पेशलायझेशन याशिवाय, मास्टर ऑफ आर्ट्सचा दोन वर्षांचा कोर्स देखील आयआयटीमधून करता येऊ शकतो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा, सोशल वर्क, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांत स्पेशलायझेशन करता येऊ शकतं. हा कोर्स सध्या फक्त आयआयटी गांधीनगर, आयआयटी मद्रास आणि आयआयटी गुवाहाटी या तीन ठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी संबंधित आयआयटी संस्था वेगळी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. हेही वाचा-Success Story: 7 वर्षाच्या वयात दृष्टिहीन होऊनही झाली देशाची पहिली नेत्रहीन IAS मास्टर ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन एमबीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी विविध आयआयटीमध्ये उपलब्ध असणारे मॅनेजमेंट कोर्स करू शकतात. या कोर्ससाठी CAT परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या अधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाते. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतही घेतली जाते. आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी रूरकी, आयआयटी कानपूर, आयआयटी धनबाद, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी जोधपूर या आठ आयआयटीमध्ये एमबीए कोर्स उपलब्ध आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Career, IIT

    पुढील बातम्या