Home /News /career /

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे सुरक्षा रक्षक पदाच्या 25 जागांसाठी भरती; 10,000 रुपये मिळणार पगार

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे सुरक्षा रक्षक पदाच्या 25 जागांसाठी भरती; 10,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  यवतमाळ, 15 सप्टेंबर: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (District collector office Yavatmal Recruitment 2021) इथे सुरक्षा रक्षक (Security Guard jobs) पदाच्या 25 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना  जारी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    सुरक्षा रक्षक (Security Guard) - एकूण जागा 25 पात्रता आणि अनुभव उमेदवार हे मिलिटरी किंवा पॅरामिलिटरीमधून निवृत्त झालेले असावेत. उमेदवारांकडे स्वतःची बंदूक असावी तसंच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असावा. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. उमेदवारांना शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणं आवश्यक असणार आहे. कामाच्या वेळे व्यतिरिक्त काही तास काम करण्याची तयारी असावी. इतका मिळणार पगार सुरक्षा रक्षक (Security Guard) - 10,000/- रुपये प्रतिमहिना निवड प्रक्रिया परीक्षा, शारीरिक चाचणी आणि त्यानंतर मुलाखत अशाप्रकारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. हे वाचा - Railway Recruitment: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 3093 जागांसाठी भरती या पत्त्यावर पाठवा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2021
  JOB TITLE  जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ भरती
   या पदांसाठी भरती     सुरक्षा रक्षक (Security Guard) - एकूण जागा 25
   पात्रता   उमेदवार हे मिलिटरी किंवा पॅरामिलिटरीमधून निवृत्त झालेले असावेत. उमेदवारांकडे स्वतःची बंदूक असावी तसंच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असावा. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. उमेदवारांना शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणं आवश्यक असणार आहे. कामाच्या वेळे व्यतिरिक्त काही तास काम करण्याची तयारी असावी.
   पगार  10,000/- रुपये प्रतिमहिना
   निवड प्रक्रिया  परीक्षा, शारीरिक चाचणी आणि त्यानंतर मुलाखत
   या पत्त्यावर पाठवा अर्ज  जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ.
  हे वाचा - 'NEET' परीक्षेबाबत तामिळनाडू सरकारचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात; देशभरातील विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Yavatmal

  पुढील बातम्या