मराठी बातम्या /बातम्या /करिअर /NDA Exam 2021: दरवर्षी पेक्षा वेगळ्या पद्धतीनं होणार NDA ची परीक्षा? जाणून घ्या Latest Updates

NDA Exam 2021: दरवर्षी पेक्षा वेगळ्या पद्धतीनं होणार NDA ची परीक्षा? जाणून घ्या Latest Updates

या परीक्षेत काही बदल होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

या परीक्षेत काही बदल होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

या परीक्षेत काही बदल होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर: नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) ही परीक्षा दरवर्षी संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) आयोजित करण्यात येते. सैन्यात (Indian Army) जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा (NDA Exam 2021) महत्त्वाची मानली जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. यापैकी 2021 या सत्रातील पहिली (NDA exam 2021) परीक्षा घेण्यात आली आहे. मात्र आता विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेची वाट बघत आहेत.  या परीक्षेत काही बदल होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

यावर्षी यूपीएससी 14 नोव्हेंबर रोजी एनडीए 2021 ची लेखी परीक्षा (NDA Exam 2021) घेणार आहे. ज्यासाठी आयोगाने 9 ते 29 जून पर्यंत अर्ज मागवले होते. या वर्षीची परीक्षा गेल्या वेळेपेक्षा वेगळी असेल की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. मात्र आता याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा - NEERI Nagpur Recruitment: NEERI नागपूर इथे 18,000 रुपये मिळणार पगार; 'या' पदासाठी आजच करा अर्ज

विशेष म्हणजे यंदाची NDA परीक्षा खास असणार आहे. आता NDA आणि NA ची परीक्षा महिलाही देऊ शकणार आहेत असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनंही याबद्दलची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक उमेदवारांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले की या निर्णयाचा परीक्षेत काही परिणाम होईल का? मात्र याचाही खुलासा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

या क्षणी या NDA च्या परीक्षेबद्दल काळजी करण्यासारखं काहीच नाही. यावर्षी परीक्षा तशीच असणार आहे यात कोणताही बदल करण्यात नाही. मात्र पुढच्या वर्षी गरजेनुसार परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो असं केंद्र सरकारकडून कोर्टाला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं काहीही कारण नाही.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Entrance exam, NDA