मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: अवघ्या 7 वर्षाच्या वयात झाली दृष्टिहीन; ब्रेल लिपित अभ्यास करून झाली देशाची पहिली नेत्रहीन महिला IAS

Success Story: अवघ्या 7 वर्षाच्या वयात झाली दृष्टिहीन; ब्रेल लिपित अभ्यास करून झाली देशाची पहिली नेत्रहीन महिला IAS

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिनं दृष्टिहीन असूनही IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिनं दृष्टिहीन असूनही IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिनं दृष्टिहीन असूनही IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 सप्टेंबर: मनात जिद्द आणि आत्मविश्वास असला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. हे आजवर आपण पुस्तकात वाचलं असेल किंवा टीव्हीत बघितलं असेल. मात्र एक व्यक्ती (IAS success story)अशीही आहे जिनं फक्त जिद्दच नाहीतर असंख्य संकटांचा सामना करत देशातीलच नाहीतर जगातील सर्वात कठीण परीक्षा (UPSC) उत्तीर्ण केली. आपल्या डोळ्यासमोर अंधार असेल तर आपण दोन पावलंही चालू शकत नाही. मात्र उल्हासनगरच्या प्रांजल पाटील हिनं दृष्टिहीन असूनही IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

महाराष्ट्रातील उल्हासनगर (Ulhasnagar) इथल्या रहिवासी प्रांजल पाटील (Pranjal Patil) यांनी आपलं प्रारंभीचं शिक्षण मुंबईतील (Mumbai) दादरच्या श्रीमती कमला मेहता शाळेतून केलं, जे प्रांजल सारख्या विशेष मुलांसाठी आहे आणि ब्रेल लिपीमध्ये शिकवतात. येथून दहावी केल्यानंतर प्रांजलनं चंदाबाई कॉलेजमधून कला शाखेत बारावी केली आणि 85 टक्के गुण मिळवले. यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पदवी घेतली.

'झी न्यूज' नं प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, प्रांजलनं पदवीमध्ये होती, तेव्हा तिनं UPSC विषयी एक लेख वाचला होता आणि ती UPSC मुळे खूप प्रभावित झाली होती. यानंतर तिनं UPSCशी संबंधित माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि मग तयारी सुरू केली. तिनं याबद्दल कोणाशीही सवांद साधला नाही मात्र आतून तयारी करत राहिली. यादरम्यान तीन JNU मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

हे वाचा - NEET बाबत तामिळनाडूच्या निर्णयाचा इतर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? वाचा

प्रांजल पाटील यांनी एक मोठे सॉफ्टवेअर JAWS (JAWS Software) तयार केलं, जे अंध आणि दृष्टिहीनांना स्क्रीनवर रीफ्रेश करण्यायोग्य ब्रेल डिस्प्लेसह स्क्रीन वाचण्यास प्रभावी ठरतं. UPSC परीक्षेची तयारी विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीनं केली जी तिच्यासाठी पुस्तकं वाचू शकत होतं. याशिवाय प्रांजलनं अनेक टेस्ट पेपर सोडवता तयारी केली होती.

प्रांजल पाटील याने 2016 मध्ये प्रथमच UPSC परीक्षा दिली आणि अखिल भारतात 773 रँक मिळवले, परंतु दृष्टिदोषामुळे त्याला रेल्वे अकाउंटंट सेवेची नोकरी मिळाली नाही. जरी त्याने हार मानली नाही. पुढच्याच वर्षी 2017 मध्ये, तिने अखिल भारतात 124 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला आणि देशातील पहिली अंध महिला IAS अधिकारी (First Visually challenged Woman IAS officer) बनली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला प्रांजलचा अभिमान आहे.

First published:

Tags: Ias officer, Success story