Home /News /career /

देशातल्या Top 10 विद्यापीठांमध्ये पुणे नवव्या स्थानावर; पण रँकिंगमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर

देशातल्या Top 10 विद्यापीठांमध्ये पुणे नवव्या स्थानावर; पण रँकिंगमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर

मुंबई IIT ला चौथं आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठाला नववं रँकिंग मिळालं आहे. दिल्लीतल्या JNU आणि जामियालाही आहे रँकिंग. पाहा भारतातली Top 10 College कोणती?

    नवी दिल्ली, 11 जून :  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी भारतभरातल्या महाविद्यालयं, विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांचं रँकिंग जाहीर होतं. या NIRF India University Ranking List 2020 मध्ये या वर्षी IIT Madras ने बाजी मारली आहे. चौथ्या क्रमांकावर मुंबईच्या IIT चा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे पहिल्या दहा टॉप शैक्षणिक संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीचाच दबदबा आहे. पहिल्या दहा टॉप युनिव्हर्सिटीच्या यादीत महाराष्ट्रातलं एकमेव पुणे विद्यापीठ समाविष्ट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc)विद्यापीठांच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. याच यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे. वाचा - 'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं ' मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी NIRF रँकिंग जाहीर केली. 9 वेगवेगळ्या शैक्षणित विभागातली टॉप 3 रँकिंग त्यांनी जाहीर केली. यामध्येही महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ नाही. डेंटल विभागात पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचा तिसरा क्रमांक लागला आहे. हा अपवाद सोडता कुठल्याही विभागात पहिल्या तीन क्रमांकात शिक्षणात अग्रेसर म्हणवणारा महाराष्ट्र दिसलेला नाही. ही आहेत भातातली पहिली 3 विद्यापीठं 1.  भारतीय विज्ञान संस्थान, बेंगळुरू (IISc, Banagluru -कर्नाटक) 2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली (JNU, दिल्ली) 3. बनारस हिंदू विद्यापीठ (Banaras Hindu University, Varasnasi- उत्तर प्रदेश) 4. अमृता विश्वविद्यापीठम, कोइम्बतूर (तमिळनाडू) 5.जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता (पश्चिम बंगाल) 6. हैद्राबाद विद्यापीठ, (तेलंगणा) 7. कलकत्ता विद्यापीठ (पश्चिम बंगाल) 8. मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल (कर्नाटक) 9. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (महाराष्ट्र) 10. जामिया मिलिया इस्लामिया (नवी दिल्ली) ओव्हरऑल रँकिंगमध्ये विज्ञान तंत्रज्ञान शैक्षणिक संस्थांचं वर्चस्व आहे. पहिल्या 5 क्रमांकांचं रँकिंग 1. IIT Madras 2. IISc Bangalore 3. IIT Delhi 4. IIT Bombay 5. IIT Kharagpur दिल्लीतले JNU दुसऱ्या स्थानावर आणि जामिया मिलियासुद्धा दहात दिल्लीत राजकीय आंदोलनाचं केंद्रस्थान ठरलेल्या JNU ने भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटीच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. NRC आणि CAA ( Citizenship Amendment act ) आंदोलनाचं केंद्र झालेल्या जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीलाही 10 व्या क्रमांकाचं रँकिंग मिळालं आहे. ही आहेत Top 3 Colleges 1.मिरांडा हाउस, दिल्ली 2. लेडी श्रीराम कॉलेज वुमन, दिल्ली 3. हिंदू कॉलेज, दिल्ली Top 10 Universities (संकलन - अरुंधती) अन्य बातम्या पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला, 100 कोटींचे ड्राग्स आणि मोठी रक्कम जप्त कोरोनाच्या संकटातही याच वर्षी होणार IPL, गांगुलीनं सांगितला प्लॅन
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pune university, University (Ontology Class)

    पुढील बातम्या