मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! कोरोनाच्या संकटातही याच वर्षी होणार IPL, गांगुलीनं सांगितला प्लॅन

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! कोरोनाच्या संकटातही याच वर्षी होणार IPL, गांगुलीनं सांगितला प्लॅन

29 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

29 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

29 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

नवी मुंबई, 11 जून : कोरोनामुळं (Coronavirus) जगभरातील सर्व स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. या कोरोनामुळं क्रिकेट विश्वाचे सर्वात जास्त नुकसान झालं आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळख असलेल्या आयपीएलवरही (IPL) कोरोनाचे सावट आहे. 29 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. मात्र आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) याच वर्षी आयपीएलचे आयोजन करणार असल्याचे सांगितले आहे.

बीसीसीआयच्या वतीनं एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये याच वर्षी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी प्लॅन तयार केला जात असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच, आयपीएलचे आयोजन झाल्यास ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येईल. दरम्यान अद्याप या स्पर्धेची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही आहे.

वाचा-डोंबिवली ते टीम इंडिया! असा होता मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा संघर्षमय प्रवास

बीसीसीआय लवकरच घेणार निर्णय

सौरव गांगुली यांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रात लवकरच आयपीएलबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आयसीसीनं नुकत्याच घेतलेल्या बैठकीत टी-20 वर्ल्ड कपबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळं आयपीएल स्पर्धा आयोजित केल्यास कोणत्या महिन्यात होईल, याबाबत संभ्रम मात्र कायम आहे. सध्या बीसीसीआयची अपेक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारतात स्पर्धेचे आयोजन न झाल्यास श्रीलंका किंवा युएईमध्ये स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. या दोन्ही देशांकडून बीसीसीआयला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

वाचा-कोरोनानंतर पहिल्यांदाच होणार क्रिकेट सामना, 8 जुलैपासून कसोटी मालिका सुरू

असा असेल प्लॅन

सरकारच्या वतीनं परदेशी विमानांना बंदी घातली असल्यामुळं परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. त्यामुळं केवळ भारतीय खेळाडू या स्पर्धेत सामिल होती. तसेच, स्पर्धा कमीत कमी दिवसांसाठी आयोजित केली जाईल. त्याचबरोबर एक ते दोन मैदानावरच स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. आयपीएल फ्रँचायझीसोबती बीसीसीआय चर्चा करत आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ म्हणतात की बीसीसीआय ऑपरेशन टीम आयपीएल आयोजित करण्याच्या योजनेवर सर्व पर्यायांचा विचार करून काम करीत आहे.

वाचा-लॉकडाऊनमध्ये निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे धोनी? साक्षीनं दिलं उत्तर

संपादन-प्रियांका गावडे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Sourav ganguly