जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! NASA विविध धर्मांच्या पुरोहितांद्वारे एलिअन्सशी साधणार संवाद? धर्मशास्त्रज्ञांना देणार नोकरी

काय सांगता! NASA विविध धर्मांच्या पुरोहितांद्वारे एलिअन्सशी साधणार संवाद? धर्मशास्त्रज्ञांना देणार नोकरी

काय सांगता! NASA विविध धर्मांच्या पुरोहितांद्वारे एलिअन्सशी साधणार संवाद? धर्मशास्त्रज्ञांना देणार नोकरी

आता NASA नं धर्मशास्त्रज्ञांना (NASA Hiring Priest) नोकरी देण्यास सुरुवात केली आहे. पण असं का? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 डिसेंबर: जगभरातील शास्त्रज्ञांसाठी एलिअन्स (Aliens) एक कुतूहलाचा विषय राहिला आहे. पृथ्वीसारखेच असे अनेक ग्रह आहेत जिथे आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा वेगळे दिसणारे जीव राहतात हे वेळोवेळी सांगण्यात आलं आहे. याबद्दल अनेकांनी अनेक सिद्धांत (Theories about Aliens) मांडले आहेत. काहींनी तर एलिअन्सना (Aliens Real Video) प्रत्यक्ष बघितल्याचा दावाही केला आहे. मात्र आता हाच दावा खरा ठरवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASA लागली आहे. एलिअन्स खरंच असतात का? (Are Aliens exists?) त्यांच्याशी कोणत्या प्रकारे संवाद साधला जाऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता NASA नं धर्मशास्त्रज्ञांना (NASA Hiring Priest) नोकरी देण्यास सुरुवात केली आहे. पण असं का? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Wion न्यूज नं याबद्दलचं वृत्त प्रकाशित केलं आहे. नॅशनल स्पेस अँड एरोनॉटिक्स अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) जगभरातील विविध धर्म एलिअन्सशी संपर्क साधण्यासाठी कशी प्रतिक्रिया देतील हे निर्धारित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 24 धर्मशास्त्रज्ञांची मदत घेत आहे. यातील एका धर्मशास्त्रज्ञानं आधीच NASA मध्ये काम सुरू केलं आहे. गोल्डन चान्स! DRDO मध्ये Research Fellowship साठी भरती; 31,000 रुपये Stipend केंब्रिज विद्यापीठातील ब्रिटीश धर्मगुरू आणि धर्मशास्त्रज्ञ रेव्ह डॉ. अँड्र्यू डेव्हिसन यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. पुढील वर्षी ते या विषयावरील पुस्तक प्रकाशित करत आहेत. आपल्या पुस्तकात तो असे प्रश्न उपस्थित करणार आहे की जीवनाचा शोध जगभरातील धार्मिक लोकांच्या श्रद्धांवर कसा परिणाम करेल. त्यासोबतच विविध धर्मांचे लोक एलिअन्ससोबत कसे संवाद साधू शकतील. अनेक शतकांपासून परकीय जीवनाचा शोध हा मानवजातीसाठी आकर्षणाचा विषय आहे. आधुनिक विज्ञानाची साधने अधिकाधिक उपलब्ध होत असताना, शास्त्रज्ञांनी परकीय जीवनाच्या शोधात विश्वाकडे एक माहितीपूर्ण नजर टाकली आहे. आपल्या सूर्यमालेतच अनेक ग्रह आहेत. शास्त्रज्ञांना वाटते की युरोपा, गुरू ग्रहाच्या बर्फाळ चंद्राच्या पृष्ठभागाखाली द्रव महासागर आहेत जे जीवनास आधार देऊ शकतात. तसेच शास्त्रज्ञांना असेही वाटते की शुक्राच्या ढगांमध्ये सूक्ष्मजंतू अस्तित्वात आहेत म्हणूनच या ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांना आहे. भारतातही आता 4 दिवसांचा आठवडा? नवीन लेबर कोडचा पगारावर काय होणार परिणाम? वाचा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb space) 26 डिसेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आली. हबल स्पेस टेलिस्कोपच्या (Hubble space telescope) तुलनेत ही मानवतेची मुख्य अंतराळ दुर्बीण असेल. आम्ही लवकरच विश्वाचे असे कोपरे पाहण्यास सक्षम असणार आहोत. जे याआधी आमच्यासाठी अस्पष्ट होते. खोल अंतराळात उडणारे एलियन स्पेसशिप सापडेल का? वेळ लवकरच सांगेल असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता हे विविध धर्मांचे धर्मशास्त्री खरंच एलिअन्ससोबत संवाद साधू शकतील का हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात