मुंबई, 27 डिसेंबर: नुकताच UAE नं संपूर्ण देशभरात साडे चार दिवसांचा आठवडा (4 day Week) जाहीर केला आहे. हजार दिवस काम आणि त्यायनंतरचा अर्धा दिवस काम अशा पद्धतीचं कामाचं स्वरूप आता UAE मध्ये असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक दिवसांपासून भारतातही चार दिवसांचा आठवडा (4 day week in India) होणार का? आणि असा चार दिवसांचा आठवडा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कामावर याचा नक्की कसा परिणाम (Benefits of 4 day week in India) होणार? याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यात आता देशात नवीन लेबर कोड (What is New labor Code) हे फायनान्शिअल इयर 2022-23 (Financial Year 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातही लवकरच चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं आहेत. पण याचा कर्मचाऱ्यांवर नक्की काय परिणाम होणार? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2022 पासून सुरू होणार्या पुढील आर्थिक वर्षात भारत वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा यांवर चार नवीन कामगार संहिता लागू करण्याची शक्यता आहे. या नवीन संहिता अंतर्गत, रोजगार आणि कार्य संस्कृतीशी संबंधित कर्मचार्यांचे घरून पगार (Salary of Employees in 4 day week), कामाचे तास आणि आठवड्याच्या दिवसांची संख्या यासह अनेक पैलू, सर्वसाधारणपणे, बदलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
NDA Exam: देशसेवेसाठी सेनेत रुजू व्हायचंय? NDA परीक्षेची करा तयारी; समजून घ्या
नवीन लेबर कोड लागू झाल्यास, सध्याच्या पाच दिवसांच्या वर्क वीकपेक्षा पुढील वर्षीपासून भारतातील कर्मचारी चार दिवसांच्या वर्क वीकचा आनंद घेऊ शकतील अशी शक्यता आहे. मात्र अशावेळी कर्मचाऱ्यांना त्या चार दिवसांत 12 तास (Working Hours in 4 day week) काम करावे लागणार आहे. चार दिवसांचा आठवडा झाला तरी आठवड्याला 48 तास काम करावेच लागेल असे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच एकदा हे लेबर कोड लागू झालेत तर कर्मचार्यांच्या टेक-होम पगारात कपात होईल. तसेच कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या PF मध्ये वाढ करावी लागणार आहे.
कर्मचाऱ्यांचा इन हॅन्ड पगार होणार कमी
नवीन कायदे कर्मचार्यांच्या मूळ वेतन आणि PF ची गणना करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घडवून आणतील. या नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात दरमहा योगदान वाढेल परंतु मासिक वेतन (Salary in 4 day week) कमी होईल. नियम भत्ते 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित होतील, ज्याचा अर्थ असा होतो की पगाराचा अर्धा भाग मूळ वेतन असेल आणि भविष्य निर्वाह निधीमधील योगदान हे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश असलेल्या मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या रूपात असेल.
सावधान! Online जॉब शोधताना 'या' चुका पडू शकतात महागात; आताच फॉलो करा टिप्स
एकूणच काय तर या सर्व गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा आणि सुट्या मिळणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या इन हॅन्ड पगारापेक्षा कमी पगार मिळणार आहे. PF मध्ये मात्र वाढ होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, India, जॉब