मुंबई, 21 जानेवारी: महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 असणार आहे. तुम्हीही या पदांसाठी अप्लाय करणार असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी असणार आहे. अप्लाय करण्याआधी तुम्ही कोणत्या IMP गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोणत्या पदांसाठी किती जागा
जागेचं नाव | एकूण जागा |
लिपिक-टंकलेखक | 7034 जागा |
सहायक कक्ष अधिकारी | 78 जागा |
राज्य कर निरीक्षक | 159 जागा |
पोलीस उप निरीक्षक | 374 जागा |
दुय्यम निबंधक | 49 जागा |
दुय्यम निरीक्षक | 06 जागा |
तांत्रिक सहायक | 01 जागा |
कर सहायक | 468 जागा |
महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी विज्ञान विषयांमधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
JOB ALERT: तुमच्याकडे डिग्री आहे? टायपिंगही येतं? मग संधी सोडूच नका; पुण्यात इथे होतेय भरती
कोणाला किती मिळेल पगार
जागेचं नाव | इतका मिळणार पगार |
लिपिक-टंकलेखक | 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना |
सहायक कक्ष अधिकारी | 38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना |
राज्य कर निरीक्षक | 38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना |
पोलीस उप निरीक्षक | 38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना |
दुय्यम निबंधक | 38,600 - 1,22,800 रुपये प्रतिमहिना |
दुय्यम निरीक्षक | 32,000- 1,01,600 रुपये प्रतिमहिना |
तांत्रिक सहायक | 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना |
कर सहायक | 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना |
महत्त्वाच्या तारखा
महत्त्वाचे कार्यक्रम | महत्त्वाच्या तारखा |
अर्ज करण्याची मुदत | 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 |
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत | 16 फेब्रुवारी 2023 |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत | 19 फेब्रुवारी 2023 |
संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ | 30 एप्रिल 2023 |
गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा | 02 सप्टेंबर 2023 |
गट क संयुक्त मुख्य परीक्षा | 09 सप्टेंबर 2023 |
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2023
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, MPSC Examination