मुंबई, 08 जून: यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. तुम्ही आता तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं News18lokmat.com वेबसाईटवर बघू शकता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन केलं आहे आणि एक महत्वाचा आणि मोलाचा संदेश दिला आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री “आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन देत म्हंटल आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: अपेक्षेपेक्षा मार्क्स कमी वाटताहेत? पुनर्मूल्यांकनासाठी असे करा अर्ज तसंच राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारावी परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले किंवा जे पास होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना संदेश देत मोलाचा सल्ला दिला आहे. “बारावीचा निकाल म्हणजे हा अंतिम टप्पा नाही. यापुढेही असे अनेक टप्पे तुम्हाला गाठायचे आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकालन लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे MH BOARD 12TH RESULT: बारावीचे पेपर्स Re-checking ला द्यायचे आहेत? मग किती लागेल फी? जाणून घ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या तारखा 10 जून ते 20 जून - पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 10 जून ते 29 जून - तुमच्या उत्तपत्रिकेच्या प्रिंटसाठी अर्ज करण्यासाठीचा कालावधी. 10 जून - पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख. 17 जून - विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजतापासून मार्कशीट मिळणार.