Home /News /career /

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: अवघ्या काही दिवसांत बोर्डाचा निकाल; रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: अवघ्या काही दिवसांत बोर्डाचा निकाल; रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा

रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा

रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा

निकाल एकदा लागला कि नक्की काय करावं? आपल्याला मनासारखे गुण मिळाले असोत किंवा नसोत. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 04 जून: यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाचे निकाल (MH BOARD 10TH AND 12TH RESULT) लवकरच लागणार आहेत. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल (MH board HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (MH board SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. MSBTE Admissions: 11वी नंतर आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाही सुरु; रिझल्टच्या आधीच करता येईल अर्ज मात्र आता अनेक विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर नक्की करावं तरी काय याबाबत प्रश्न पडले असतील. निकाल बघण्यापर्यंत विद्यार्थ्यानं सर्व गोष्टी माहिती आहेत. मात्र निकाल एकदा लागला कि नक्की काय करावं? आपल्याला मनासारखे गुण मिळाले असोत किंवा नसोत. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. निकालाचं प्रिंट घ्या निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही मी,रस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. शाळेतून किंवा कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात अकरावी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे. सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. MH BOARD 10TH AND 12TH RESULT: निकालाआधी विद्यार्थ्यांची वाढली धक..धक; 'या' तारखेला लागेल निकाल करिअर काउन्सिलरला भेटा बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल हे विद्दयार्थ्यांसाठी भविष्याची नवीन दिशा ठरवणारे असतात. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी करिअर निवडताना एक्सपर्ट्सची मदत घेणं आवश्यक आहे. म्हणूनच करिअर काउन्सिलर ला भेटणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला करिअर निवडण्यात अडचण होणार नाही.
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Ssc board, State Board

    पुढील बातम्या