Home /News /career /

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: निकालाआधी विद्यार्थ्यांची वाढली धक..धक; 'या' तारखेला लागेल निकाल

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: निकालाआधी विद्यार्थ्यांची वाढली धक..धक; 'या' तारखेला लागेल निकाल

नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच

नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच

नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर निकाल आल्यामुळे बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात धक..धक वाढली आहे.

    मुंबई, 03 जून: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांतच बोर्डाचे निकाल (10th, 12th Board exam results) जाहीर होण्याची चिन्हं आहेत. यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही (Maharashtra state board exams Result) उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर निकाल आल्यामुळे बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात धक..धक वाढली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे. MSBTE Admissions: 11वी नंतर आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाही सुरु; रिझल्टच्या आधीच करता येईल अर्ज यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकलाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीरफ होतील. कधी लागणार बोर्डाचे निकाल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. MH Board 10th and 12th Result: अखेर प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात बारावीचा निकाल होणार जाहीर किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाहीदहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे.
    First published:

    Tags: 10th class, Board Exam, Exam result, HSC, Maharashtra News, Ssc board, State Board

    पुढील बातम्या