Home /News /career /

MSBTE Admissions: 11वी नंतर आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाही सुरु; रिझल्टच्या आधीच करता येईल अर्ज

MSBTE Admissions: 11वी नंतर आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाही सुरु; रिझल्टच्या आधीच करता येईल अर्ज

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

या प्रवेश पोर्टलच्या (Poly Admissions Portal) उदघाटनाच्या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

    मुंबई, 03 जून: कोरोनाच्या काळात परीक्षा रद्द झाल्यानंतर यंदा मात्र दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना निकालाची (MH BOARD 10TH AND 12TH RESULT) प्रतीक्षा आहे. निकालाच्या आणि प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर आता आज पासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला (Polytechnic Admissions Process 2022) आजपासून सुरुवात झाली आहे. या प्रवेश पोर्टलच्या (Poly Admissions Portal) उदघाटनाच्या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल अजूनही जाहीर झाला नाहीये. मात्र त्या आधीच विद्यार्थ्याच्या सोयीसाठी पॉलिटेक्निकची अर्ज प्रक्रिया (Diploma Admissions Procedure 2022) सुरु होणार आहे. तसंच निकाल लागण्याची आधी विद्यार्थ्यांना आपली संपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड करायची आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि इतर निकालासंबंधीची माहिती प्रवेश पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना https://msbte.org.in/ हा ऑफिशिअल वेबसाईटवर नजर असणं आवश्यक आहे. अनाथ विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा यंदा पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा विशेष कल असणार आहे त्यामुळे यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे. म्हणून च ज्या विद्यार्थ्यांनी आई-वडील कोरोनामुळे गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये दोन जागा राखीव असणार आहेत. तसंच अशा विद्यार्थ्यांचा पन्नास हजारपर्यंतचा शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. निकालानंतर जाहीर होईल मेरिट लिस्ट प्रवेश प्रक्रिया जरी निकालाच्या आधी सुरु होत असली तरी विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपली माहिती पोर्टलला अपलोड करायची आहे. निकालानंतर मार्क्स आणि इतर गोष्टी अपलोड करता येतील. विद्यार्थ्यांचे मार्क्स बघूनच त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे त्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. ITI नंतरही मिळणार Poly ला प्रवेश विशेष म्हणजे ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांशी आता जुनिअर इंजिनिअर होता येणार आहे. यासाठी त्यांना ITI चं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येणार आहे. तसंच अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही शाखेत प्रवेश घेता येणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Education, Exam result, Ssc board, State Board

    पुढील बातम्या