मराठी बातम्या /बातम्या /करिअर /MSEDCL Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे इथे 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती; इथे करा अप्लाय

MSEDCL Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे इथे 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती; इथे करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पुणे, 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Pune) इथे लवकरच 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSEDCL Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री या पदांसाठी ही भरती (Mahavitaran Pune Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री (Apprentice-Wireman /Electrician) - एकूण जागा 47

MSEDCL Pune Recruitment 2021

MSEDCL Pune Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री (Apprentice-Wireman /Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित शाखेमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हे वाचा - Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी बंपर पदभरती

वयोमर्यादा

या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांचं वय हे 30 वर्षांपर्यंत असावं. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांचं वय 35 वर्षांच्या अधिक नसावं.

ही कागदपत्रं आवश्यक

दहावी आणि बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र.

ITI उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र.

ओळखपत्र, आधार कार्ड. पॅन कार्ड

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला असणं आवश्यक.

या पदभरतीसाठी एक वर्षांचा प्रक्षिक्षण कालावधी असणार आहे.

तसंच मंचर विभागासाठी ही भरती असणार आहे.

हे वाचा - SBI Recruitment 2021: 600 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021

JOB ALERTMSEDCL Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरती   अप्रेन्टिस-वीजतंत्री/तारतंत्री (Apprentice-Wireman /Electrician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवबारावी उत्तीर्ण तसंच संबंधित शाखेमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकदहावी आणि बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र. ITI उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र. ओळखपत्र, आधार कार्ड. पॅन कार्ड मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला असणं आवश्यक.
एकूण जागा47

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Pune, जॉब