मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी बंपर पदभरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी बंपर पदभरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुंबई,16 ऑक्टोबर: पश्चिम रेल्वे मुंबई इथे लवकरच तब्बल 80 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ आशुलिपिक, कनिष्ठ अनुवादक /हिंदी, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

कनिष्ठ आशुलिपिक (Junior Stenographer)

कनिष्ठ अनुवादक /हिंदी (Junior Translator /Hindi)

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

तंत्रज्ञ (Technician)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ आशुलिपिक (Junior Stenographer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच स्टेनोग्राफर या पदांसाठी आवश्यक शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अनुवादक /हिंदी (Junior Translator /Hindi) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच सांधीत पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तीन वर्षांचा पूर्णवेळ इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ (Technician) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्णवेळ ITI शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी - 42 वर्ष

OBC साठी - 45 वर्ष

SC/ST प्रवर्गासाठी - 47 वर्ष

अशी होणार उमेदवारांची निवड

या पदभरतीसाठी सुरुवातीला सर्व पात्र उमेदवारांची CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे.

यानंतर CBT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रं तपासली जाणार आहे.

यानंतर मेडिकलचाचणी करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

सुरुवातीला उमेदवारांनी ऑफिशिअल वेबसाईट www.rrc-wr.com ओपन करायची आहे.

या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपलं नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, जात इत्यादी गोष्टी योग्य [पद्धतीन नमूद करणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी त्यांचा सुरु असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब