मुंबई, 12 फेब्रुवारी: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा 03 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वेळापत्रक नीट माहीत नसते किंवा आपला गोंधळ होतो. अशावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी आपण वेळपत्रक नीट पाहाणं महत्त्वाचं आहे. वेळापत्रक पाहिलं नाही तर आपण चुकीच्या विषयाचा अभ्यास करू किंवा कदाचित एखादा पेपरही चुकण्याची शक्यता आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर http://www.mahahsscboard.in/ पाहाता येणार आहे. मात्र तरीही आपल्या डोक्यात वेळापत्रकाचा संभ्रम होऊ नये म्हणून इथेही आपण वेळापत्रक अगदी सुटसुटीतपणे पाहू शकता.
03 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
प्रथम भाषा- मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी
03 मार्च 2020 : दुपारी 03.00 ते 06.00
जर्मन आणि फ्रेंच
04 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
द्वितीय आणि तृतीय भाषा- मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी
द्वितीय आणि तृतीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम- मराठी संयुक्त
06 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
द्वितीय आणि तृतीय भाषा- हिंदी
द्वितीय आणि तृतीय भाषा संयुक्त- हिंदी
07 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
द्वितीय आणि तृतीय भाषा- उर्दू, गुजराती, संस्कृत, पाली, अर्धमागधी, पर्शियन, अरेबिक, अबेस्ता, पहलवी, रशियन
07 मार्च 2020 : दुपारी 03.00 ते 05.00
उर्दू (संयुक्त), संस्कृत(संयुक्त), पाली (संयुक्त), अर्धमागधी (संयुक्त), अरेबिक (संयुक्त), पर्थियन (संयुक्त), फ्रेंच (संयुक्त),जर्मन (संयुक्त), रशियन(संयुक्त), कन्नड(संयुक्त), तमिळ(संयुक्त), तेलुगु (संयुक्त), मल्याळम्(संयुक्त), सिंधी(संयुक्त), बंगाली (संयुक्त), पंजाबी(संयुक्त), गुजराती(संयुक्त)
हेही वाचा-SSC Exam : गुण मिळवून देणारा इतिहास आणि भूगोलाचा पेपर सोडवताना...
09 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 2.00
प्रथम भाषा - इंग्रजी तृतीय भाषा- इंग्रजी
12 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
बीजगणित, अंकगणित
14 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
भूमिती
16 मार्च 2020 : सकाळी 11. 00 ते दुपारी 1.00
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- 1
16 मार्च 2020 : सकाळी 11. 00 ते दुपारी 1.30
शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र
18 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- 2
21 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
सामाजिक शास्त्र भाग1- इतिहास आणि राज्यशास्त्र
23 मार्च 2020 : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
सामाजिक शास्त्र भाग2- भूगोल
हेही वाचा-SSC Board Exam : इंग्लिश विषय अवघड नाही, पास होण्यासाठी करा 'या' गोष्टी