SSC Exam : गुण मिळवून देणारा इतिहास आणि भूगोलाचा पेपर सोडवताना...

SSC Exam : गुण मिळवून देणारा इतिहास आणि भूगोलाचा पेपर सोडवताना...

इतिहार-भूगोल हे विषय आपल्याला मार्क मिळवून देणारे असतात.

  • Share this:

मुंबई, 10 फेब्रुवारी: इतिहार-भूगोल हे विषय आपल्याला मार्क मिळवून देणारे असतात. यामध्ये नकाशा, सनावळी आणि उत्तर लिहिण्याची पद्धत यामध्ये आपण मार्क घालवतो. धडे जर व्यवस्थित वाचले असतील तर आपण सगळे प्रश्न नीट सोडवू शकतो. त्यामुळे या विषयांना धड्यांचं चातकाच्या नजरेनं धड्यांचं वाचन करायला हवं.

प्रश्न-1 हा एका वाक्यात उत्तर रिकाम्या जागा असेल त्यासाठी 6 मार्क आहेत हा थेट मार्क मिळवून देणारा आहे.

प्रश्न-2 मध्ये कॉन्सेप्ट चार्ट, टाईमलाईन किंवा काहीही येऊ शकतं यासाठी 4 मार्क आहेत.

प्रश्न-3 ते 5 हे प्रश्न धड्यांवर आधारित आहेत. त्यामुळे धड्यांवरील प्रश्न आणि धड्यांचं वाचन महत्त्वाचं आहे.

प्रश्न 6 ते 8 हे पॉलिटिकल सायन्सवर आधारित असणार आहे. ज्यामध्ये राज्यशास्त्र, नागरिकशास्त्राचा समावेश असेल. ह्या प्रश्नांसाठी हे प्रश्न मार्क मिळवून देणारे आहेत. त्यामुळे याचा सराव करताना लक्षपूर्वक करा.

हेही वाचा-Board Exam : केलेला अभ्यास लक्षात राहात नाही? मग करून पाहा 7 गोष्टी

पेपर जसा पुढे सरकतो तसा तो अधिक कठीण होत जाताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे उत्तर लिहिताना सन, साल, नियम चुकणार नाहीत याची काळजी घ्या. पेपर साधारण 30 ते 35 पानांचा असतो. याशिवाय सप्लिमेंटची सुविधा असते. त्यामुळे पेपर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटेल असा सोडवा. त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होत असतो. अक्षर बारी किंवा फार मोठं असेल तर मोकळं आणि योग्य जागा सोडून लिहावं. ज्यामुळे पेपर दिसायला सुटसुटीत दिसेल. बऱ्याचवेळा आपल्याकडे मुद्दे खूप असतात अशावेळी क्रमांक टाकून मुद्दा आणि त्यामध्ये दोन ते तीन ओळीमध्ये उत्तर मांडण्याचा प्रयत्न करावा.

उत्तर पत्रिका लिहिताना किमान वाचनीय अक्षरात आणि स्वच्छ दिसेल अशी लिहावी. खाडाखोड झाली असेल तर  एक रेष मारून पुढे जावे. एकाच वेळी चार रेषा मारल्यामुळे उत्तर पत्रिका वाईट दिसते.

हेही वाचा-HSC-SSC Board Exam : कशी सोडवावी प्रश्न पत्रिका? बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिताना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2020 08:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading