मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SSC Board Exam : इंग्लिश विषय अवघड नाही, पास होण्यासाठी करा 'या' गोष्टी

SSC Board Exam : इंग्लिश विषय अवघड नाही, पास होण्यासाठी करा 'या' गोष्टी

 इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हमखास होणार पास.

इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हमखास होणार पास.

इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हमखास होणार पास.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 10 फेब्रुवारी: मराठी माध्यमात शिकताना इंग्रजीचा पेपर म्हटलं की पोटात गोळा येतो. इंग्रजीच्या पेपरला पास होण्याइतके मार्क मिळू दे देवा असं साकडंही विद्यार्थी देवाकडे घालतात. इंग्रजी विषयाचा पेपर सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हमखास नापास होणार नाही. पास होण्यापुरते मार्क तर नक्कीच मिळतील. त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या गोष्टी आणि टेक्निक्स आपण लक्षात घेतल्या तर पास होणं कठीण नाही.

1. इंग्रजीतील विषयाचा पेपर 80 मार्कांचा असतो. त्यापैकी Language studyवर आधारीत 10 मार्क, Textual passageवर आधारित 20 मार्क, कवितेवर आधारित 10, पुस्तकाबाहेरील उतारा आणि त्यावरील प्रश्न 15 मार्क, Writing skill साठी 15 आणि creative writing साठी 10 मार्क असा पेपरचा एकून आराखडा आहे.

2. पहिल्या सेक्शनमध्ये A आणि B असे दोन प्रश्न असतील A सेक्शनसाठी 8 तर B साठी 2 मार्क असतील. हा प्रश्न नीट सोडवला तर पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो.

3. सेक्शन दोनमध्ये पुस्तकातील दोन उतारा देण्यात येईल त्यावर प्रश्न विचारला जाईल. प्रत्येक उताऱ्यासाठी 10 मार्क असणार आहेत.

4. सेक्शन-3मध्ये कविता देण्यात येईल त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात येईल. त्यामध्ये एक कविता पुस्तकातील असेल एक कविता पुस्तकाबाहेरची असेल. प्रत्येक कवितेसाठी 05 मार्क असणार आहेत.

5. सेक्शन 4-मध्ये धड्याबाहेरचा उतारा असेल. त्यावर आधारित प्रश्न, त्याचा सारांश लेखन, यासारखे प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न Subjective असतील. या सेक्शनसाठी एकूण 15 मार्क देण्यात आले आहेत. हेडिंगसह सारांश लेखन करायचं आहे. यासाठी एकूण 05 मार्क आहेत.

हेही वाचा-HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका

6. सेक्शन 5- writing skill यामध्ये पत्रलेखन, formal आणि informal असे दोन्ही येतं. याशिवाय एखादा निबंध किंवा संवाद लिहिण्यासाठी येतो. यासाठी दोन्ही मिळून 15 मार्क आहेत.

7. सेक्शन 6- यामध्ये रिपोर्ट लिहायला येतो, कथा, संवाद लेखन, कोटेशन्स अशा प्रकारचे प्रश्न येतात. या सेक्शनसाठी 10 मार्क आहेत.

8. पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं करायचं ते म्हणजे सेक्सन 1 आणि 6ची तयारी पक्की करून जाणं, याशिवाय पत्र लेखनाचा आराखडा चुकवला नाही तर तिथेही मार्क मिळतात. सारांश लेखन, निबंधही थोडे मार्क मिळवून देणारा आहे. त्यासाठी आपल्या शब्दात सोपी पण छोटी वाक्य लिहा. सोप्या शब्दात आपल्याला जे सांगायचं आहे ते मांडा.

9. उतारा आणि कवितेचे प्रश्न सोडवताना काही प्रश्न हे कविता आणि उताऱ्यात लपलेले अगदी एका वाक्यातील असतात. त्यामुळे ते सोडवता आले पाहिजेत.

10. इंग्रजीचा पेपर सोडवताना सोपे शब्द आणि कमी चुका होतील याची काळजी घ्या. वाक्य छोटी आणि सोपी लिहिण्याचा प्रयत्न करा. शक्यतो उतारा आणि कवितेचे प्रश्न सोडले तर बाकी 55 मार्कांचा पेपर तर आपण नीट सोडवला तरीही आपण नक्की पास होऊ शकतो.

हेही वाचा-Board Exam : केलेला अभ्यास लक्षात राहात नाही? मग करून पाहा 7 गोष्टी

First published:

Tags: English, Milk maharashtra, SSC, Ssc board