मुंबई, 07 सप्टेंबर : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी व्हेकन्सी आहे. एकूण 153 जागांवर भरती आहे. जिल्हा हेल्थ ऑफिसर कॅडर आणि जिल्हा सर्जन कॅडर या पदांसाठी जागा आहेत. जिल्हा हेल्थ ऑफिसर कॅडरसाठी 30 जागा आहेत. तर जिल्हा सर्जन कॅडर पदासाठी 123 जागा आहेत. एकूण 153 जागांवर ही भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता हेल्थ ऑफिसरसाठी MBBS, निरोधक आणि सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदविका (D.P.H.) किंवा मेडिकल काॅन्सिल ऑफ इंडियाने समतुल्य म्हणून स्वीकारलेली पात्रता हवी. तसंच 5 ते 7 वर्षांचा अनुभव हवा. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8 हजार जागांवर भरती, ‘या’ उमेदवारांनी करावा अर्ज सर्जन पदासाठी MBBS, कोणत्याही वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल काॅन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पात्रता, तसंच 5 वर्षांचा अनुभव हवा. वयाची अट 1 सप्टेंबर 2019पर्यंत 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे. अर्जाची फी सर्वसामान्यांसाठी 500 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 300 रुपये आहे. SBI मध्ये 477 जागांवर भरती, ‘या’ उमेदवारांना मिळेल पसंती अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001 अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2019 अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in इथे क्लिक करा. तसंच, महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी आहे.तिथे भरती केली जाणार आहे. तब्बल 3450 जागांवर ही भरती आहे. त्यात मुंबईत 1076 जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी 720 जागा आहेत. रेल्वेमध्ये सुरू आहे 252 जागांसाठी भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. पूर्वी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जायची. पण आता यात बदल केलाय. अधिक माहितीसाठी https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice इथे क्लिक करा. महापोर्टलद्वारे ही पहिलीच भरती आहे. अर्ज स्वीकारणं 3 सप्टेंबरपासून सुरू झालंय. शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2019. VIDEO : उद्धव ठाकरेंकडे पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘माझा लहान भाऊ…’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.