SBI मध्ये 477 जागांवर भरती, 'या' उमेदवारांना मिळेल पसंती

SBI मध्ये 477 जागांवर भरती, 'या' उमेदवारांना मिळेल पसंती

SBI, Jobs - एसबीआयमध्ये नोकरीची मोठी संधी आहे

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : तुम्हाला बँकेत नोकरी करायचीय? मग SBI तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन आलीय. एकूण 477 पदं भरायची आहेत. स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर, एसओ या पदांवर अर्ज मागवलेत. अॅप्लिकेशन फाॅर्म 6 सप्टेंबर म्हणजे आजच प्रसिद्ध केलेत. अधिक माहितीसाठी sbi.co.in वर लाॅग इन करा.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. उमेदवाराला परीक्षा आणि इंटरव्ह्यू द्यावा लागेल. लिखित परीक्षेचा मापदंड 70 टक्के आणि इंटरव्ह्यू 30 टक्के असं मोजमाप होईल. ही परीक्षा ऑनलाइन असेल. 20 ऑक्टोबरला ही परीक्षा होईल.

रेल्वेमध्ये सुरू आहे 252 जागांसाठी भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

असा करा अर्ज

वेबसाइट sbi.co.in वर जा

Loading...

होमपेजवर जाऊन careers सेक्शनवर जा

नंतर ‘Specialist cadre regular recruitment’ वर क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना वाचा

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

पूर्ण माहिती रजिस्टर करा

फाॅर्म भरा आणि फोटो अपलोड करा

अर्ज फी भरा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा

अर्ज फी

सर्वसामान्य उमेदवाराला 750 रुपये भरावे लागतील, आरक्षण असलेल्यांना 125 रुपये भरावे लागतील.

पगार

ज्युनियर मॅनेजर पदासाठी उमेदवाराला 42,020 पगार मिळेल. मॅनेजर 2 आणि 3 च्या उमेदवाराचा पगार क्रमश: 45,950 आणि 51,490 रुपये आहे. सीनियर मॅनेजर 4 चा पगाप 59,170 रुपये असेल.

PNB होणार देशातली दुसरी मोठी बँक, ग्राहकांना करावे लागतील हे 6 बदल

योग्यता

BE/B.Tech असलेले उमेदवार अर्ज करू शकतो. किंवा संबंधित क्षेत्रात काम करणारा उमेदवार

महत्त्वाच्या सूचना

1. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात

2. उमेदवारांनी अर्जाची फी भरल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही

3. अर्ज आपल्या योग्य पदासाठी करावा.

4. इंटरव्ह्यू आणि लिखित परीक्षेसाठी काॅल लेटर ईमेलद्वारे पाठवतील.

वंचितमधून MIM बाहेर पडण्याचं हे आहे कारण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SBI
First Published: Sep 6, 2019 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...