मुंबई, 06 सप्टेंबर : भारतीय रेल्वेनं विविध पदांसाठी व्हेकन्सी काढलीय. एकूण 252 पदांवर भरती करायची आहे. कमर्शियल क्लार्क कम तिकीट क्लार्क आणि ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी www.rrbcdg.gov.in इथे सर्व माहिती वाचून क्लिक करावं. अर्ज घेणं सुरू झालंय आणि शेवटची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019. या पदासाठी सर्वसामान्य उमेदवारांचं जास्तीत जास्त वय 42 वर्ष हवं. एससी,एसटी उमेदवारांसाठी 47 वर्ष तर ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षांची वयोमर्यादा आहे. अर्ज करणारा उमेदवार परीक्षा देत असेल किंवा रिझल्टची वाट पाहत असेल तर तो पात्र नाही. SBI देतेय 1 तासात कर्ज, ‘असा’ करा अर्ज पदं आणि पदसंख्या कमर्शियल क्लार्क कम तिकीट क्लार्क - 124 पदं ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट - 128 पदं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019. वेळेच्या आधीच अर्ज करावा, असं रेल्वेचं म्हणणं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, ‘अशी’ होईल निवड रेल्वेप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातही मोठी व्हेकन्सी आहे.तिथे भरती केली जाणार आहे. तब्बल 3450 जागांवर ही भरती आहे. त्यात मुंबईत 1076 जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी 720 जागा आहेत. उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. पूर्वी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जायची. पण आता यात बदल केलाय. SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज अधिक माहितीसाठी https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice इथे क्लिक करा. महापोर्टलद्वारे ही पहिलीच भरती आहे. अर्ज स्वीकारणं 3 सप्टेंबरपासून सुरू झालंय. शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2019. तसंच, मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेड (MMRC)नं डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदं मिळून एकूण 6 व्हेकन्सीज आहेत. MMRC च्या या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.mmrcl.com इथे क्लिक करा. शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2019. VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.