मुंबई, 07 सप्टेंबर : तुम्हाला शिक्षकाच्या नोकरीची चांगली संधी आहे. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या पदासाठी भरती आहे. एकूण 8 हजार जागांवर भरती केली जाईल. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक अशी पदं आहेत. शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदांसाठी संबंधित विषयात 50 टक्क्यांपर्यंत पदव्युत्तर शिक्षण, पदवी आणि बीएडची पदवी हवी. प्राथमिक शिक्षकासाठी संबंधित विषयात 50 टक्क्यांपर्यंत पदवी, बीएड किंवा डिप्लोमा हवा. SBI मध्ये 477 जागांवर भरती, ‘या’ उमेदवारांना मिळेल पसंती वयाची अट 1 एप्रिल 2020 रोजी फ्रेशर्ससाठी 40 वर्षाच्या आत वय हवं. अनुभवी उमेदवाराचं वय 57 वर्षाच्या आत हवं. अर्जाची फी 500 रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2019 आहे. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी स्क्रीनिंग परीक्षा होईल. अधिक माहितीसाठी http://aps-csb.in/College/Index_New.aspx इथे क्लिक करा. रेल्वेमध्ये सुरू आहे 252 जागांसाठी भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी आहे.तिथे भरती केली जाणार आहे. तब्बल 3450 जागांवर ही भरती आहे. त्यात मुंबईत 1076 जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी 720 जागा आहेत. उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. पूर्वी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जायची. पण आता यात बदल केलाय. शिक्षक व्हायचंय? मग या अभ्यासक्रमांची माहिती हवीच अधिक माहितीसाठी https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice इथे क्लिक करा. महापोर्टलद्वारे ही पहिलीच भरती आहे. अर्ज स्वीकारणं 3 सप्टेंबरपासून सुरू झालंय. शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2019. तसंच मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेड (MMRC)नं डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदं मिळून एकूण 6 व्हेकन्सीज आहेत. MMRC च्या या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.mmrcl.com इथे क्लिक करा. शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2019. चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.